Moving In With Malaika: 'माझ्या मुलामूळे फक्त मला...' अरबाज खानच्या कुटुंबाबद्दल मलायकाचा धक्कादायक खूलासा...

Moving In With Malaika
Moving In With MalaikaEsakal
Updated on

मलायका अरोरा सध्या तिच्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' याशोमुळे चर्चेत आहे. ती या शोमध्ये जशा चार बायका एकत्र येऊन गप्पा मारतात तसंच तिच्या शोमध्ये तिच्या निकटवर्तीयांना बोलावून त्याच्यांशी गप्पा मारते. त्यांना तिच्या समस्या सांगते आणि त्याच्याशी चर्चा करते. ती या शो मध्ये मोकळेपणाने बोलतांना दिसतेय.

Moving In With Malaika
Moving In With Malaika: "हे माझं शरीर..मला वाटेल ते.." मलायकाचं ट्रोलिंगवर उत्तर

मलायका अरोराचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की, ती नेहमी मनापासून बोलताना दिसते. मग कोणी तिच्याशी सहमत असो किंवा नसो. 'मूव्हिंग इन विथ मलायका'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये असचं काहीसं घडलं. मलायका ही खान कुटुंबाची सून होती. त्यामूळे यावेळी ती खान कुटुंबाबद्दल मनापासून बोलताना दिसली.

Moving In With Malaika
Moving With Malaika Review: 'मला चांगलं म्हणा! सांगणारी मलायकाची 'पांचट' सीरिज

या शोद्वारे मलायकानं हे देखील सिद्ध केलं की अभिनय आणि नृत्याव्यतिरिक्त ती स्टँडअप कॉमेडीही चांगली करू शकते. सध्या ती शोमध्ये खान कुटुंबाविषयी अनेक खुलासे केले आहे. मलायका खान कुटुंबासाठी अग्रस्थानी नव्हती. शोमध्ये करण जोहरशी बोलताना मलायका म्हणाली की, अरबाज खानच्या कुटुंबासाठी ती नंबर 1 नाही, फक्त त्यांचा मुलगा अरहानमुळे सगळे तिला सपोर्ट करतात.

अरबाज खानच्या कुटुंबाबद्दल पुढे बोलताना मलायका म्हणते की, मी त्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कधीच येऊ शकत नाही. पण अरहानमुळे त्यांना तिची काळजी वाटते. हे करणं देखील योग्य आहे. यावर मलायकाशी बोलताना करण म्हणतो, तुझ्या अपघातानंतर संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत उभे असल्याचं दिसलं. म्हणजे ते तिथे होते. काही नातं कायमची असतात. मलायका अरोराचा शो मूव्हिंग इन विथ मलायका शो सोमवार ते गुरुवार Disney+Hotstar वर प्रसारित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.