Twinkle Khanna Post : ट्विंकलनं नाव बदललं की मोठा निर्णय घेतला? महिला दिनाच्या पूर्व संध्येला 'त्या' पोस्टनं चर्चेला उधाण!

ट्विंकलच्या (Twinkle Khanna Post) त्या पोस्टनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
Twinkle Khanna Latest News
Twinkle Khanna Latest Newsesakal
Updated on

Twinkle Khanna latest News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि वक्तव्यामुळे लाईमलाईटमध्ये राहणारी सेलिब्रेटी आहे. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (Twinkle Khanna viral post) त्या पोस्टमध्ये ट्विंकलनं जे काही केलं आहे यामुळे ट्विंकलच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन की आणखी काही वेगळी बातमी....अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ ट्विंकल खन्ना ही तिच्या अभिनयामुळे चर्चेत राहिली. भलेही तिच्या वाट्याला फारसे चित्रपट आले नाहीत. मात्र तिनं लवकरच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं बॉलीवूडपासून दूर झाली.

सध्या ट्विंकल खन्ना ही प्रसिद्ध लेखिका, निर्माती म्हणून कार्यरत आहे. ती सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिनं इंस्टावर जी पोस्ट केली आहे त्यात तिनं तिचं नाव खोडून त्या खाली कुमार एस प्लस वन असे लिहिले आहे. ती पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अंदाज वर्तवले आहे. काहींना असा अंदाज व्यक्त केला आहे की, ट्विंकल ही प्रेग्नंट आहे. तिनं तिची गुड न्यूज शेयर केली आहे.

Twinkle Khanna Latest News
Laapataa Ladies Marathi Review: पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग... विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा लापता लेडीज

काही नेटकऱ्यांनी हे प्रकरण महिलेचं माहेरचं नाव आणि सासरचं नाव याविषयी असल्याचं म्हटलं आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ट्विंकलची ती पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. अशा प्रतिक्रिया तिला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ती रेड पोस्ट शेयर करत तिनं चाहते, सोशल मीडिया युझर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्विंकलनं तिचं माहेरचं नाव का बदललं आणि त्या जागी कुमार का लिहिलं असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यावर नेटकरी म्हणतात हे प्रकरण पतीकडील नाव आणि माहेरचं नाव असं आहे.

Twinkle Khanna Latest News
Aamir Khan : 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' चाहत्याच्या प्रश्नावर आमिरनं दिलं उत्तर!

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, दिल्ली हायकोर्टामधील त्या याचिकेवर न्यायालयानं काही निरिक्षणं नोंदवली होती. गृहनिर्माण मंत्रालयानं ज्या काही सुचना केल्या होत्या.त्यावर कोर्टानं पुन्हा नवे बदल सुचवले आहे. त्यानुसार विवाहित महिलेला पहिले आडनाव (माहेरचे आडनाव) मिळवायचे असल्यास तिनं घटस्फोट झाल्याचे प्रतिज्ञापत्र किंवा तिच्या पतीकडून एनओसी घेणे आवश्यक आहे.

दिल्ली कोर्टाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यात असे म्हटले होते की, या सुचना म्हणजे लिंग भेदभाव आहे. महिलांच्याबाबत असं करणं म्हणजे ते अन्यायकारक आणि खेदजनक असल्याचेही न्यायालयानं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.