Union Minister Ramdas Athawale On Gadar 2: सनी देओल-अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटाने अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर 'OMG 2' बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर दिली.
तरी देखील 'गदर 2' च्या वादळासमोर कोणीही टिकू शकलेले नाही. 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये सनी देओलचा गदर 2 सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टिमचं कौतुक केलं होतं. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सिनेमा पाहिला आहे. या चित्रपटाच्या टिमची त्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर चित्रपटाचे समर्थन करत शासनाकडे काही मागण्यादेखील केल्या आहे. .
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर गदर 2 च्या टीमसोबतचे फोटो शेअर केले. यासोबत त्यांनी लिहिले की, "गदर 2 चित्रपट सर्वत्र करमुक्त व्हावा आणि त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळावा, ही माझी मागणी आहे." या पोस्टमध्ये त्यांनी अनिल शर्मा आणि सनी देओलला टॅग केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले.
गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या चित्रपटाला केंद्रीय मंत्र्याकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल ट्विट शेअर केले आहे. ते म्हणाले की, "रामदास आठवले जी, मला आणि गदर 2 च्या संपूर्ण टीमला देशभक्तीने प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद."
गदर 2 च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटी क्लबमध्ये एंट्री करेल. गदर 2 हा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
गदर 2 ने 19 व्या दिवशी 5.10 कोटी रुपये जमा केले आहेत. आता या सिनेमाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने 465.75 कोटींची कमाई केली आहे तो लवकरच 500 कोटींचा टप्पा गाठेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.