उर्फी जावेद हे नाव सोशल मिडियावरील चर्चेतलं नावं आहे. उर्फी जावेद नेहमी तिच्या फॅशनने सर्वांना थक्क करते. विचित्र फॅशनचा नमुना सादर करण्याबरोबरच ती काही मुद्यावर तिचं मतही माडंत असते. त्याचबरोबर तिच्यावर टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही ती देत असते.
उर्फी जावेद जिथेही जाईल तिथे ती सर्वांच लक्ष वेधत असते. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता हे नेटकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं आहे.
ती तिच्या मुद्यावर ठाम असते. तिला तिच्या ड्रेसमुळे बऱ्याचवेळा ट्रोलही केल जात अलीकडेच उर्फीने सोशल मीडियावर शेअर केले की तिला तिच्या कपडे घालण्याच्या शैलीमुळे मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला गेला नाही. उर्फी जावेदला एका रेस्टॉरंटमध्ये एंट्री देण्यात आली नाही, यामुळे ती संतापली आणि तिने आपला राग सोशल मीडियावर काढला.
तिच्या फॅशन सेन्सशी सहमत नसेल तर तिच्याशी वेगळं वागणं चुकीचं असल्याचंही ती म्हणाली. या घटनेनंतर त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे, जी व्हायरल झाली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'मुंबई, हे खरंच 21 वे शतक आहे का? आज मला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
तिने पुढे लिहिलं की, 'तुम्हाला माझी फॅशन आवडत नसेल तर ठीक आहे, पण त्यामुळे माझ्याशी असं वागणे योग्य नाही आणि जर तुम्ही तसं केलं तर ते स्वीकारा. खोटे कारण सांगू नका'. उर्फी जावेदने ही पोस्ट शेअर करताना Zomato ला टॅग केले आहे. यावरून उर्फी जावेदला झोमॅटोच्या रेस्टॉरंटमध्ये एंट्री देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंबधित तिचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती कार मधुन उतरते आणि रेस्टॉरंटमध्ये जातांना दिसते मात्र तेथील व्यक्ती तिला आत जाण्यापासून थांबवतो आणि उर्फी त्याच्यावर खुप संतापते. इतकच नाही तर ती त्याला धमकीही देतांना दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.