Urfi Javed Harassed: 'मी काही पब्लिक प्रॉपर्टी नाही', चालू विमानात उर्फी जावेदसोबत गैरवर्तन

Urfi Javed Harassed
Urfi Javed HarassedEsakal
Updated on

Urfi Javed harassed: सोशल मडियावर नेहमी चर्चेत असलेलं नाव म्हणजे उर्फी जावेद. काही क्वचितच लोक असतील ज्यांना उर्फी जावे हे नाव माहित नसावं. ती तिचे व्हिडिओ , तिचं वक्तव्य आणि तिच्या फॅशनने नेहमीच चर्चेत असते.

प्रत्येक मुद्दयावर ती तिचं स्पष्ट मत मांडत असते. उर्फी नेहमी असं काहीतरी करते की त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये राहते. नुकतच तिने मणिपुर येथे झालेल्या हिंसाचारावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती.

Urfi Javed Harassed
Vivek Agnihotri: हिम्मत असेल तर मणिपूर फाईल्स बनवुन दाखवा, विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान

तिला बऱ्याचदा तिच्या बोल्डनेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र आता उर्फीसोबत असा काहीसा प्रकार घडला विमानात घडला आहे.

अलीकडेच गोव्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये उर्फी जावेदसोबत काही मुलांनी गैरवर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत उर्फीनं या घटनेचा निषेध केला आहे.

काही वेळापुर्वी सोशल मिडियावर उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यात तिने बार्बी लूकमध्ये मणिपूर हिंसाचारासाठी आवाज उठवला होता. योवेळी तिच्या हातात एक पोस्टर होतं. उर्फी गोव्याला जात असतांना विमानात तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

Urfi Javed Harassed
Director Vasu Patil: दादासाहेब फाळकेंच्या फिल्मसिटीमध्ये मराठी दिग्दर्शकाची गळचेपी! गेटवर अडवुन अपमानास्पद वागणूक...
Urfi Javed Harassed
Urfi Javed Harassed

याबाबतत तिने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टाकला आणि लिहिले की, "काल मुंबई ते गोव्याला फ्लाइटमध्ये प्रवास करताना माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. या व्हिडिओमध्ये ही मुलं घाणेरड्या गोष्टी बोलत होते आणि माझ्यासोबत वाईट वागणूक करत होते. मी त्यांना असं वागू नका असं देखील सांगतिलं तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्यांचा मित्र मद्यधुंद अवस्थेत आहे नशेत असणं हे महिलांशी गैरवर्तन करण्याचे कोणतेही कारण नाही. होय मी सेलिब्रिटी आहे पण मी काही पब्लिक प्रॉपर्टी नाही.'

Urfi Javed Harassed
Tony Bennett Died: अमेरिकन सिंगर टोनी बेनेटचं काळाच्या पडद्याआड, वाढदिवसाआधीच निधन झाल्याने हळहळ

मणिपूरमधील घटनेवर उर्फीची इंस्टावर लिहिलं होत की, आपल्याला जो प्रकार होतो आहे याची लाज वाटायला हवी. जे काही होतं आहे ते केवळ मणिपूरसाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा शब्दांत उर्फीनं तिची भावना व्यक्त केली आहे.

उर्फीनं मणिपूरमधील घटनेवर आवाज उचलला होता तर दुसरीकडे तिलाच फ्लाईटमध्ये अशी वागणूक देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com