Urfi Javed : उर्फी जावेदने सांगितले प्रकृती खराब होण्यामागील कारण; म्हणाली...

मला आजारी पडणे अजिबात आवडत नाही
Urfi Javed Health News
Urfi Javed Health NewsUrfi Javed Health News
Updated on

Urfi Javed Health News उर्फी जावेदची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री तिच्या आउटफिट्स आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रकृती बिघडल्यानंतर सोशल मीडियावर स्वत:चा फोटो शेअर करून प्रकृतीची माहिती दिली होती. आता तिने प्रकृती कशी बिघडली हे सांगितले आहे. भविष्यात अशी बेफिकिरी करणार नाही असेही तिने सांगितले.

माझी प्रकृती बरी नव्हती. खूप ताप आला होता. अशक्तपणा होता. हा विषाणूजन्य ताप (Viral Fever) होता. परंतु, मी तो गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे मला नंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मी रुग्णालयात दोन ते तीन दाखल होती. ७ ऑगस्टला मला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, असे उर्फी जावेदने सांगितले.

Urfi Javed Health News
Ratan Rajput : तो जंगलात ओढत होता अन् लोक तमाशा बघत होते; रतनने सांगितली घटना

मला आजारी पडणे अजिबात आवडत नाही. पुन्हा आजारी पडणार नाही अशी आशा आहे. कारण, आजारी पडल्याने कामावर परिणाम होतो. मला वचनबद्धतेची पूर्तता न करणे आवडत नाही. मी प्रकृतीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले, असेही उर्फी जावेदने (Urfi Javed) सांगितले.

माझे वेळापत्रक खूप व्यस्त असतानाही मी माझ्यासाठी वेळ काढेल आणि प्रकृतीकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेईल, असेही उर्फी जावेद म्हणाली. उर्फी जावेद आणि चाहत खन्ना यांच्यातील भांडण अलीकडेच चर्चेत होते. दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एकमेकांबद्दलचा राग आणि द्वेष व्यक्त केला होता, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.