Urfi Javed: फरार झालेली उर्फी सुवर्ण मंदिरात दिसली! संस्कारी लूक सोशल मिडियावर व्हायरल

Uorfi Javed Visit Golden Temple: बनावट अटकेच्या व्हिडिओच्या वादानंतर उर्फी जावेद आता सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी अमृतसरला पोहोचली आहे. तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Uorfi Javed Visit Golden Temple
Uorfi Javed Visit Golden TempleEsakal
Updated on

Uorfi Javed Visit Golden Temple: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या ग्लॅमरस फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र काही दिवसांपुर्वी एका बनावट व्हिडिओमुळे उर्फी गोत्यात आली होती. छोटे कपडे घातल्यामुळे पोलिस तिला अटक करतात असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

Uorfi Javed Visit Golden Temple
Evan Ellingson: प्रसिद्ध अभिनेता इवान एलिंग्सनचा मृत्यू! 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आणि असा बनावट व्हिडिओ केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उर्फी फरार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र उर्फीने ती दुबईत असल्याचे सांगितले.

आता बनावट व्हिडिओच्या वादानंतर उर्फीने अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. सध्या उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Uorfi Javed Visit Golden Temple
CWC 2023 : भारतीय टीममध्ये कोण आहे 'चुलबूल पांडे' अन् 'बजरंगी भाईजान'? सलमान खाननं कुणाचं घेतलं नाव

उर्फी जावेद बुधवारी सुवर्ण मंदिरात पोहोचली. उर्फीची बहीणही यावेळी तिच्यासोबत होती. हे फोटो शेयर करताना उर्फीने लिहिले- वाहेगुरु. यावेळी उर्फीने पिंक कलरचा सूट घातलेला दिसत आहे. उर्फीचा हा संस्कारी लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

उर्फी जावेदचा हा लेटेस्ट लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

एकानं लिहिलं की, "अरे भावा, मा हे काय पाहिलं?" तर दुसऱ्याने लिहिलं, "तू असे कपडे घालते." तर एकानं लिहिलयं, "ही उर्फी जावेदच आहे, नाही का?"

Uorfi Javed Visit Golden Temple
Janhvi-Shikhar: दिवाळीला जान्हवीच्या बॉयफ्रेंडनं फोडला बॉम्ब! शिखरनं खुलेआम दिली प्रेमाची कबुली

सध्या हे फोटो व्हायरल होत आहे नेटकरी यावर कमेंट करत आहेत. तर दुसरीकडे आता बनावट व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खुद्द मुंबई पोलिसांनी त्यांच्या X वर पोस्ट शेअर करत स्पष्ट शब्दात उर्फीला सुनावलं होत.

मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'पोलिसांसोबत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुंबई पोलिसांचा गणवेश वापरून असे व्हिडिओ बनवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उर्फी जावेदविरोधात एफआयआर नोंदवला आहे.' आता मुंबई पोलिस उर्फीला चौकशीसाठी बोलावतील अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.