उर्फी जावेदने हे असं नाव आहे जे सर्वांनाच चांगलच माहित आहे. ती तिच्या नवनविन आइडिया वापरुन चित्रविचित्र वस्तूंचा वापर कपडे म्हणून करत असते आणि तिच्या फॅशनने आणि लूकने सर्वांना आश्चर्यचकित करत असते. तिच्या बोल्ड आणि फॅशनने ती नेहमीच ट्रोर्लसच्या निशाण्यावर असते. उर्फी दिसली की तिने कोणत्या वस्तूचा ड्रेस म्हणून वापर केला आहे याकडे सर्वांचे लक्ष असते.मात्र या वेळी उर्फी तिच्या विचित्र फॅशनमुळे नाही. तर तिने पुर्ण कपडे घातल्यामुळे ट्रोल झाली.
हो! तुम्ही बरोबर वाचलं.. उर्फी पुर्ण कपड्यात दिसली. ती मुबंई विमानतळावर दिसली. जेव्हा पापाराझींनी तिला विमानतळावर स्पॉट केलं. यावेळी तिने ब्लू जिन्स आणि व्हाइट टि शर्ट घातला होता. त्यासोबत तिने गुलाबी रंगाचा कोट घातला होता. तोंडावर मास्क लावलेला होता. ती गाडीतुन उतरल्यावर तिला पापाराझींनी फोटोसाठी विचारणा केली आणि मास्क काढण्यास सांगितले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. डोळ्यावरील गॉगल न काढता ती तिथून रवाना झाली.
तिच्या या व्हिडिओमुळे ती पुन्हा ट्रोल झाली आहे. तिच्या व्हिडोओला नेटकरींनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले,”जेव्हा पुर्ण कपडे घालते तेव्हा चेहरा दाखवत नाही पहिली मुलगी आहे जिला पुर्ण कपडे घातल्यानंतर लाज वाटते” , तर दुसरा म्हणतोय,”आज तिला बोर्डिंगला एंन्ट्री नाही मिळणार कारण तिला कोणी ओळखणारच नाही”.”अरे बघा बघा दिदीकडे कपडे आले”. तर तिने व्हिडिओ किंवा फोटो न काढु दिल्यामुळे एकाने कमेंट केली आहे कि उर्फी म्हणत असावी की नको आज माझा व्हिडीओ काढु नका आज मी चांगले कपडे नाही घातले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.