Urfi Javed : 'उर्फी तुझ्यामुळे आमची मुलं बिघडतात', पालकांची तक्रार! उर्फीनंही मग काढला कानामागे जाळ

उर्फीचं नाव आता सगळीकडे झालं आहे. त्याला कारणही तसेच आहे.
Urfi Javed on turning heads with a bold sartorial style
Urfi Javed on turning heads with a bold sartorial styleesakal
Updated on

Urfi Javed on turning heads with a bold sartorial style : उर्फीचं नाव आता सगळीकडे झालं आहे. त्याला कारणही तसेच आहे. उर्फीनं स्वताची वेगळी ओळख व्हावी यासाठी फॅशन म्हणून जे काही केलं आहे त्याची चर्चा होताना दिसते. तिनं कोणत्याही वस्तूला फॅशन म्हणून उपयोगात आणले आहे. बरं ती फॅशन तिनं तिच्या एकटीपुरती मर्यादित ठेवलेली नाही.

उर्फीचा एक दिवस असा जात नाही ज्यादिवशी तिनं अतरंगी फॅशनचा व्हिडिओ किंवा फोटो शेयर केला नाही. ती नेहमीच वेगवेगळया रंगाचे, ढंगाचे, आकाराचे फोटो इंस्टावरुन, फेसबूकवरुन शेयर करतच असते. त्याला नेटकरी, चाहते प्रतिसाद देताना दिसतात. काही जणांनी उर्फीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण उर्फीनं तिच्या घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचे ऐकले नाही. तिथे ती दुसऱ्या कुणाचे कसे ऐकेल?

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

आता उर्फीविषयी आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यात तिनं वेगळ्याच गोष्टीवर खुलासा केला आहे. २५ वर्षांच्या उर्फीनं काल तर भन्नाट पोस्ट शेयर केली होती. त्यात तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याचे दिसून आले होते. त्यावरुनही तिला नेहमीप्रमाणे चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये सहभागी झालेल्या उर्फीनं तिच्या स्वभावाप्रमाणे मत व्यक्त केले आहे.

Urfi Javed on turning heads with a bold sartorial style
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

दरम्यान एका महिलेनं उर्फीला प्रश्न विचारला. उर्फी तुझ्यामुळे माझ्या लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो आहे. असे तिनं म्हटलं. यावर उर्फीनं देखील त्या महिलेला परखड शब्दांत उत्तर दिल्याचे दिसून आहे. उर्फी म्हणाली, तुमची मुलं आहेत. आणि तुम्हीच त्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती कुणामुळे बिघडत असतील असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्याचा दोष मला का देता, आणखी एका महिलेनं तिच्या मुलावरुन उर्फीला प्रश्न विचारला तेव्हाही तिनं तिखटपणे त्यांना उत्तर दिलं.

तुम्ही जेव्हा तुमच्या पतीकडून मार खाता तेव्हा ते उदाहरण खूपच चांगले असते का तुमच्या मुलीसाठी. त्यामुळे ती काही माझी मुलं नाहीत. त्यामुळे मी त्यांची जबाबदारी का घेऊ, मी कुणी राजकीय व्यक्ती नाही की तुमची जबाबदारी घ्यायला. मनोरंजन क्षेत्रात काम करते. आणि मी माझे काम करते आहे. असेही उर्फीनं यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com