Urfi Javed tv entertainment model share : सोशल मीडियावर नेहमीच आपल्या अतरंगी पेहरावानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी उर्फी आता वेगळ्याच संकटात सापडली आहे. कायम वेगवेगळ्या प्रकारे मेक अप करुन स्वताला लाईमलाईट ठेवणाऱ्या उर्फीच्या डोळ्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन तिला ट्रोल केले जात आहे.
उर्फीसाठी हे वर्ष भन्नाट गेले आहे. तिनं वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करुन आपल्या अनोख्या स्टाईलनं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्यामुळेच की काय उर्फी ही सतत लाईमलाईटमध्ये राहिली आहे. मात्र यासगळ्यात तिला काही जीवघेण्या गोष्टींचाही सामना करावा लागला आहे. मेकअपचा अतिरेक उर्फीच्या जीवावरच बेतल्याच्या गोष्ची घडल्या आहेत. चांगलं आणि हटके दिसण्याचा तिचा अट्टाहास तिला भोवल्याचे दिसून आले आहे.
तो फोटो शेयर करताना तिनं त्यावर दिलेली कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. उर्फी लिहिते की, काल मी माझ्या डोळ्यांना झालेली दुखापत मेक अपनं लपवली होती. मात्र आता ती दिसते आहे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे तो म्हणजे मी कुणाला काही मारपीट केलेली नाही. आय फिलर्स केलेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे.
आता उर्फीनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या डोळ्यांना किती गंभीर इजा झाली आहे हे चाहत्यांना सांगितले आहे. त्या फोटोला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. उर्फीनं यावेळी मेक अप करताना कोणती काळजी घ्यायला हवी हेही सांगितले आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी उशिरा सुचलेलं शहाणपण अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फीच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे त्या फोटोंमध्ये दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी बीजेपी कार्यकर्ता दिनेश देसाई यांनी उर्फीची तुलना कॉग्रेसचे राहुल गांधी यांच्याशी केली होती. यामुळे देखील सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. जर टी शर्ट परिधान करुन राहुल गांधी पंतप्रधान होणार असतील तर उर्फी ही अमेरिकेची राष्ट्रपती व्हायला हवी. अशी बोचरी टीका देसाई यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.