'मी कधीच मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फीनं सांगितलं कारण

Urfi Javed
Urfi Javedgoogle
Updated on

उर्फी जावेद (Urfi Javed) ही बीग बॉसमधून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक आहे. पण, तिने अतिशय कमी वेळात प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या उर्फी तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी एका मुस्लीम कुटुंबातील असून दररोज होणारं ट्रोलिंग, लग्न आणि प्रेमाबद्दल तिनं बिनधास्तपणे स्वतःचं मत मांडलं (Urfi Javed Views On Religion) आहे. मी मुस्लीम मुलाशी कधीही लग्न करणार नाही, असं उर्फीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

''माझा इस्लामवर विश्वास नाही''

''बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीही गॉडफादर नाही. तसेच मी मुस्लीम धर्मातून येते. त्यामुळे लोकांना माझा बोल्ड लूक आवडत नाही. पण, मला मिळालेल्या बहुतेक द्वेषयुक्त टिप्पण्या मुस्लिम लोकच देतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते माझा तिरस्कार करतात. कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या स्त्रियांनी विशिष्ट पद्धतीने वागावे असे वाटते. त्यांना समाजातील सर्व महिलांवर नियंत्रण ठेवायचे आहे. यामुळे मी इस्लामवर विश्वास ठेवत नाही. त्यांना धर्माप्रमाणे माझ्याकडून वागणूक अपेक्षित आहे. त्यामुळे ते मला ट्रोल करतात'', असं उर्फीनं म्हटलं. ती इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होती.

''मी कधीच मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही, कारण...''

जेव्हा तू एखाद्याच्या प्रेमात पडशील किंवा लग्नाची वेळ येईल तेव्हा काय निर्णय घेशील? असा प्रश्न विचारल्यानंतर उर्फी सांगतेय, “मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लामवर विश्वास ठेवत नाही. तसेच मी कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. म्हणून मी कोणाच्या प्रेमात पडले तरी मला याची मला पर्वा नाही. आपण ज्याच्याशी लग्न करू इच्छितो त्याच्याशी लग्न केले पाहिजे.”

''कोणावरही धर्माची सक्ती करू नये''

''कोणावर धर्माची सक्ती केली जाऊ नये. प्रत्येकाला कोणत्या धर्माचे पालन करायचे आहे हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि माझ्या घरी मला हेच शिकविण्यात आले आहे. माझे वडील खूप कट्टरवादी होते. मी १७ वर्षांची असताना मला आणि माझ्या भावंडांडाना आईजवळ ठेवून ते सोडून गेले. माझी आई खूप धार्मिक स्त्री आहे. पण, तिने आमच्यावर कधीही आपल्या धर्माची सक्ती केली नाही. माझे भावंडे इस्लामचे पालन करतात. पण मी त्या धर्माचं पालन करत नाही. पण त्यांनी माझ्यावर कधीच जबरदस्ती केली नाही. समाजात देखील असंच असायला हवं. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांवर तुमच्या धर्माची सक्ती करू शकत नाही. कोणत्या धर्माचे पालन करायचे हे हृदयातून यायला पाहिजे. अन्यथा अल्लाह आणि तुम्ही दोघांपैकी एकालाही आनंद होणार नाही'', असं परखड मत उर्फीनं व्यक्त केलं.

उर्फी सध्या भगवद्गीता वाचतेय -

“मी सध्या भगवद्गीता वाचत आहे. मला फक्त त्या धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. मला त्यातील तार्किक भागामध्ये जास्त रस आहे. मला कुठल्याही धर्माच्या कट्टरवादाचा तिरस्कार आहे'', असंही उर्फी म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.