कॅमेऱ्यासमोर कपडे खायला लागली उर्फी जावेद; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आऊटफिट्सचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या उर्फी जावेदनं आता कहरच केलेला दिसून आला आहे.
Urfi Javed
Urfi JavedGoogle
Updated on

सोशल मीडियावर उर्फी जावेदची(Urfi Javed) नेहमीच चर्चे रंगते ते तिच्या अतरंगी फोटो आणि व्हिडीओमुळे. तिच्या फॅशन सेन्समुळे कधी तिच्यावर टीका होते,कधी तिची खिल्ली उडवली जाते. पण उर्फी हे राखी सावंतचंच व्हर्जन आहे,जिला काहीच फरकच लोकांच्या बोलण्याचा पडत नाही. ती आजच्यापेक्षा उद्या कैकपटीनं विचित्र काहीतरी करत लोकांसमोर येते. त्यामुळे अर्थातच तिच्यावर टिका करणारे जसे आहेत तसेच तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सची संख्याही काही कमी नाही बरं का. ती तिच्या आऊटफिट्समध्ये नेहमीच काहीतरी भन्नाट करताना दिसून येते.

Urfi Javed
राखी सावंतवर हसणाऱ्यांनो कधीतरी तिच्यातील माणुसकीलाही दाद द्या !

आता उर्फी जावेदनं एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी मात्र हैराण झाले आहेत. या व्हिडीओत उर्फी कॉटन कॅंडी(Cotton Candy) खाताना दिसत आहे. पण जेव्हा नजर तिच्या कपड्यांवर पडते तेव्हा कळतं अरे तिनं कॉटन कॅंडीपासून बनवलेलाच ड्रेस घातला आहे. गुलाबी रंगाच्या कॉटन कॅंडीचा ब्रालेट टॉप,ग्रीन कलरचा शॉर्ट स्कर्ट तिनं परिधान केला आहे.

व्हिडीओत उर्फी कॉटन कॅंडी खातानाही दिसत आहे. पण मध्येच ती हातातली कॉटन कॅंडी फेकून देते आणि अंगात कॉटन कॅंडीपासून बनलेला टॉप खायला लागते. आता हे पाहून मात्र नेटकरी तिच्यावर भलतेच भडकले आहेत. उर्फीनं हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर काहीच वेळात तो व्हायरल झाला आहे. तिच्या या विचित्र अवताराला पाहून डोकं गरगरलं नाही तर नवल. तर दुसरीकडे उर्फीवर टीका करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिला रमझानची आठवण करुन देत म्हटलंय,''अगं मुसलमान ना तू,रमझान सुरू आहे तेव्हा तरी नीट वाग''. तर एकानं लिहिलंय,''हा हिचा पब्लिसिटी स्टंट आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.