Urfi Javed: उर्फी जावेद 'लॉकअप 2' आणि 'खतरों के खिलाडी 13' चा असणार भाग! जाणून घ्या काय आहे सत्य

उर्फी जावेदबद्दल आता नवीन बातमी समोर येत आहे. उर्फीला रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्याचे समजते.
urfi javed
urfi javedSakal
Updated on

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेचा भाग असते. खासकरून तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे उर्फी प्रसिद्धीच्या झोतात राहते. उर्फीने तिच्या फॅशनमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता तर मोठमोठे डिझायनरही तिच्या फॅशनने प्रभावित झालेले दिसतात. उर्फी जावेद जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा ती चर्चेत असते. उर्फी जावेद शेवटची रिअॅलिटी शो स्प्लिट्सविलामध्ये दिसली होती.

उर्फी जावेदबद्दल आता नवीन बातमी समोर येत आहे. उर्फीला रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्याचे समजते. रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगनाच्या 'लॉकअप 2'साठी तिला अप्रोच करण्यात आले आहे.

मात्र, ही बातमी किती खरी आहे, हे खुद्द उर्फीनेच पुढे येऊन सांगितले आहे. चाहत्यांना उर्फीकडून जाणून घ्यायचे होते की ती दोन शोपैकी कोणत्या शोसाठी सहमत आहे.

urfi javed
Kasba Bypoll Result 2023 : 'साताऱ्याचा कंदी पेढा' कसब्यात पडला 'फिका', मिळाली अवघी...

दरम्यान, उर्फी जावेदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती या बातम्यांशी संबंधित सत्य सर्वांसमोर मांडत आहे. उर्फी जावेदला हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, मला कोणत्याही रिअॅलिटी शोसाठी संपर्क करण्यात आलेला नाही. या सर्व गोष्टी अफवा आहेत. मी जेलमध्ये जावे अशी तुमची इच्छा आहे, अशा शब्दांत उर्फीने कंगनाच्या शो लॉकअपसाठी ही कमेंट केली होती.

उर्फी म्हणाली की, रिअॅलिटी शोमध्ये जाऊन मी काय करणार, मी शो मध्ये गेले तर तुमचा व्यवसाय कोण चालवणार. उर्फीच्या या गोष्टींवरून ती कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शोच्या बाहेर ती तिच्या फॅशन सेन्सने तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. उर्फीने या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()