Chitra Wagh vs Uorfi Javed: चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे उर्फीला मॉब लिंचिंगचा धोका..वकिलाची तक्रार

Chitra wagh vs Urfi Javed
Chitra wagh vs Urfi JavedEsakal
Updated on

Chitra Wagh vs Uorfi Javed: सध्या उर्फी हे नावं जरा जास्तच चर्चेत आलं आहे. आधी हे नाव फक्त अतंरगी फॅशनमुळं चर्चेत होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून हे नाव जरा जास्तच गाजतयं त्याच कारण आहे उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद..उर्फी रोज काहीना काही ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधते आणि चित्रा वाघ प्रेस घेत तिच्यावर आरोप करतात आणि तिला धमकी देतांना दिसतात.

मात्र आता भाजपच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमकीमुळे उर्फी जावेद हिला मॉब लिंचिंगचा धोका असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात अधिवक्ता नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहून ऑनलाइनद्वारे तक्रारही दाखल केली आहे.

Chitra wagh vs Urfi Javed
Urfi Javed : रस्त्यावर फिरतांना 'फॅशन' अन् चाकणकरांना भेटायला जाताना 'फॉर्मल' असं कसं चालेल उर्फी!

वकील सातपुते यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून चित्रा वाघ यांच्यावर पोलिस कारवाईची मागणी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, ' उर्फी जावेद जिकडे दिसेल तिचं तिकडे तोंड फोडेल'.


Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

वकील नितीन सातपुते यांनी त्याच्या तक्रारीत लिहिलयं की, 'चित्रा वाघ उर्फी जावेदच्या वेशभूषेवर लोकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करत आहे. चित्रा वाघ यांचे समर्थक उर्फीला ट्रोल करत आहेत आणि यामुळे तिची प्रतिमा खराब करत आहेत.'

Chitra wagh vs Urfi Javed
Urfi Javed: "अरे यार! आता देवेंद्रजीसुद्धा.. "

'एवढेच नाही तर रस्त्याच्या मधोमध उर्फीचं तोंड फोडण्याची धमकी चित्रा वाघ यांनी दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये चित्रा वाघ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना ही धमकी दिली होती. त्या म्हणाला की, ज्या दिवशी उर्फी माझ्या हाती सापडली , 'मी आधी तो थोबाडीत मारेल, मग मी काय केले ते ट्विट करून सांगेन.'

Chitra wagh vs Urfi Javed
Urfi Javed Chitra Wagh : 'सासूबाईं'विरोधात उर्फीची तक्रार, रुपाली चाकणकरांना भेटणार

'चित्रा वाघ आजही म्हणाल्या आजही सांगते उर्फी जावेद समोर आली तर तिला आधी साडी चोळी देईल. मात्र त्यानंतरही तिने तिचा नंगानाच सुरु ठेवला तर थेट तिचं थोबाड फोडणार आहे. उर्फीला कपड्यांची अॅलर्जी असेल तर सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारची औषधे पुरवण्यास सक्षम आहोत, असं चित्रा वाघ म्हणाल्या होता.

त्यामुळे अशा आक्रमक भाषेमुळे उर्फी जावेदवर हिंसक हल्ले होऊ शकतात, असे वकिलाने म्हटले आहे. त्यामुळे महिला आयोगाने चित्रा वाघ यांच्यावर पोलिस कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.