उर्मिला निंबाळकरने काढले पुरुषी मानसिकतेचे वाभाडे, म्हणाली लाज वाटत..

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने नवऱ्याचे उहादरण देऊन पुरुषी मानसिकतेला धारेवर धरले आहे. मुलांचे संगोपन करणे ही आईचीच जबाबदारी असते, या विचारधारेला तिने छेद दिला आहे.  
urmila nimbalkar
urmila nimbalkargoogle
Updated on

अभिनयासोबतच स्वत:चे युट्युब चॅनल सुरु करुन यशाच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. शिवाय अनेक वादग्रस्त विषयांवर ती भाष्य करत असल्याने ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. तीच्या प्रेग्ननसीच्या काळातही ती व्हिडीओच्या माध्यामात चाहत्यांच्या संपर्कात होती. विशेष म्हणजे बाळाचे संगोपन करण्यासोबतच ती तिच्या कामालाही प्राधान्या देत आहे.

urmila nimbalkar
अभिनेता सागर कारंडेवर का आली ही वेळ, दिसला इथे..

या सर्व कामात तिचा पती सुकीर्त तिला मदत करत असतो. मुलाला सांभाळण्यापासून ते उर्मिलाला हातभार लावण्यापर्यंत तो संसाराचा गाडा ओढण्यात तिच्याइतकाच सहभाग घेतो. त्यामुळे काही बुरसटलेल्या मानसिकतेचे लोक उर्मिलावर टिका करुन तिला ट्रोल करत असतात. अशाच ट्रोलरची बोलती तिने बंद केली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन तिने एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये पुरुषत्व काय हे सांगण्याचा तिने प्रयत्न केला आहे. यावेळी पुरुषत्व म्हणजे काय हे सांगताना तिने नवऱ्याचे कौतुक केले आहे.

urmila nimbalkar
'माझाही भुतकाळ रणबीरपेक्षा कमी नाही' आलिया असं का म्हणाली?

'त्याला लाज नाही वाटत, बाळाला पोटाशी बांधून फिरायला न्यायची. बघतात फिरताना लोक नजर रोखून, बिघडलीय आत्ताची पिढी, असंही मनात म्हणत असतील. पण बाळाचे लंगोट बदलण्यापासून, ते माझ्या शुटिंगच्या दरम्यान, त्याला संपूर्णपणे सांभाळण्यापर्यंत @sukirtgumaste सगळं मनापासून आनंदाने करत असतो. आणि हे सगळं स्वतःचं उत्तमरित्या करिअर सांभाळून! जेव्हा आयुष्याचा जोडीदार असं म्हणलं जातं, तेव्हा बाळ सांभाळण्याची जबाबदारी मात्र फक्त स्त्रीवर येऊन पडते. दूधासाठी बाळाला आईच हवी पण इतर सर्व कामे, पुरुष उत्तम करु शकतात, ज्यांनं स्त्रीला पुरेशी विश्रांतीही मिळते आणि तिच्या करिअरकडे तिला लक्ष देण्यासाठी थोडी उसंतही,' अशा शब्दात उर्मिलाने सुकीर्तचे उदाहरण देऊन बुरसचलेल्या विचारांच्या लोकांना सुनावले आहे.

'मी आणि सुकीर्त एका प्रायोगिक नाटकाच्या संस्थेत भेटलो, तेव्हाही तो स्रीयांच्या प्रश्नाकडे अतिशय कळकळीने, आदराने पहायचा. लग्न झाल्यानंतरही उचित ठिकाणी त्यानं स्वतःच्या आयुष्यातील प्रत्त्येक स्त्रीची बाजू घेतली. त्याच्या आईची बाजू, सहकारी, मी, माझी आई, मैत्रीण सर्वांचं म्हणणं अतिशय empathetically त्याला समजून घेतां येतं. जेव्हा बाळ झालं तेव्हाही पठ्ठ्यानं साथ सोडली नाही. हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे,' असंदी ती पुढे म्हणते. उर्मिलाची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली असून अनेकांनी सुकीर्तचे कौैतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.