Urmila Nimbalkar News: मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचं सोशल मिडीयावर खुप फॅन फॉलोईंग आहे. उर्मिला आता एक प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा झाली आहे. उर्मिला तिच्या युट्यूबच्या चॅनलमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.
मराठमोळ्या उर्मिलाची आता थेट 'गुगल'भरारी झालीय. गुगल इंडीयाकडून उर्मिलाला आमंत्रण मिळालं असुन देशातील मानाच्या क्रिएटर्समध्ये उर्मिलाला स्थान मिळालंय.
(urmila nimbalkar will be selected google youtube india content creators workshop)
यश मिळवल्यावर उर्मिलाने केल्या भावना व्यक्त
थेट गुगल इंडीयाने दखल घेतल्यामुळे उर्मिलाने सोशल मिडीयावर तिचा आनंद व्यक्त केलाय. उर्मिला लिहीते, "आपल्या चॅनेलसाठी अभिमानाची गोष्ट की @googleindia तुमची दखल घेऊन, विशेष कार्यशाळेसाठी तुम्हाला निवडतं, ज्यामधे देशांतल्या top creators बरोबर शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यातही मराठीचा डंका @youtubeindia वर वाजू लागलाय, याचा प्रचंड आनंद वाटतो."
स्वतःचा स्टूडिओ असणारी पहिली मराठी अभिनेत्री
उर्मिला निंबाळकर ही स्वतःचा स्टूडिओ असणारी पहिली मराठी अभिनेत्री आहे. उर्मिलाला खरी ओळख दिली ती सोशल मीडियाने (Social Media). एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने स्टूडिओबद्दल लिहिले.
२०२२ ला उर्मिलाने स्वतःचा स्टूडिओ बनवला. त्याआधी उर्मिलाला स्वतःचे व्हिडीओ बनवण्यासाठी नैसर्गिक लाईट्सचा आधार घ्यावा लागायचा. यासंंबंधी उर्मिलाने पोस्ट केली होती, "शेवटी... आम्ही आमचा स्वतःचा यूट्यूब स्टुडिओ उबनवला आणि तिथे आम्ही आमचे पहिले शूट केले. चार वर्षांपूर्वी आमचा यूट्यूबचा प्रवास मोबाईलवर सुरू झाला. तेव्हा लाईट नव्हती, माईकचे बजेट नव्हते. त्यामुळे जोपर्यंत आऊटडोअर लायटिंग होती तोपर्यंत शूट संपवावा लागायचा."
उर्मिलाला नवऱ्याची भक्कम साथ
उर्मिला जेव्हा गरोदर होती तेव्हा ती तिचे अनुभव शेअर करायची. पुढे उर्मिलाला बाळ झाल्यावर तिने अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला. तरीही ती गरोदरपणाचे अनुभव सोशल मिडीयावर शेअर करत होती.
उर्मिलाला या सर्व प्रवासात तिच्या नवऱ्याची भक्कम साथ मिळाली. उर्मिलाच्या नवऱ्याचं नाव सुकीर्त गुमास्ते. उर्मिलाला या सर्व प्रवासात तिचा नवऱ्याची भक्कम साथ मिळाली. उर्मिला आणि सुकीर्तला गुगल आणि युट्यूब इंडीयाने बोलावल्याने भारतात मराठीचा डंका वाजलाय हे निश्चित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.