Urvashi Rautela Trolled: बॉलिवूडची सौंदर्यवती उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत राहते ती चित्रपटात कमी दिसत असली तरी सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. त्यामुळे चर्चेतही असते. असं कधी होणारच नाही की उर्वशी रौतेलानं काही पोस्ट शेयर केली अन् ती व्हायरल झाली नाही.
ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होत असते. बऱ्याचदा ती क्रिकेटर ऋषभ पंत याच्यामुळे ट्रोलिंगचा सामना करत असते. ती नेहमी अशा काही पोस्ट टाकत असते की नेटकरी तिच्यावर निशाणा साधतात.
असं काही तरी उर्वशीनं आता पुन्हा केलं आहे. तिनं एक ट्विट केलं मात्र नेहमी प्रमाणे त्या ट्विटमध्ये गडबड केली. उर्वशी तिच्या ट्विटमध्ये चुकून अभिनेता पवन कल्याणला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हटलं.
उर्वशी रौतेला पवन कल्याणसोबत 'ब्रो' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान अभिनेत्रीनं या चित्रपटानिमित्त सोशल मिडियावर ही पोस्ट टाकली होती.
ती पोस्टमध्ये लिहिते की, आंध्र प्रदेशच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना आनंद झाला..पवनकल्याण आमच्या #BroTheAvatar चित्रपटात उद्या #२८ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होत'
काही वेळात तिचं हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झालं अन् नेटकऱ्यांनी तिला अक्कल शिकवायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आहेत असं सांगत तिच्या ज्ञानात भर केली.
एका यूजरने लिहिले की ही तु खरचं 'नो ब्युटी नो ब्रेन' आहे. तर एकानं तिला मद्यपान न करता ट्विट करण्याचा सल्ला दिला.
इतकच नाही तर पवन कल्याणच्या पॅरोडी अकाऊंटनेही या ट्विटवर कमेंट केली आहे. 'ट्विटरवर मला आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनवल्याबद्दल धन्यवाद . मी खूप आनंदी आहे. लवकरच भेटू.' असा खोचक टोमणा त्यांनी उर्वशीला मारला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.