Urvashi Rautela: 'कशासाठी तर बाईच्या सन्मानासाठी'! उर्वशीनं कापले केस

उर्वशी भलेही तिच्या नेटकऱ्यांना कितीही बोल्ड वाटत असली तरी तिची वेगळी ओळख अनेकांना माहिती नाही.
Urvashi Rautela
Urvashi Rautelaesakal
Updated on

Urvashi Rautela- उर्वशी भलेही तिच्या नेटकऱ्यांना कितीही बोल्ड वाटत असली तरी तिची वेगळी ओळख अनेकांना माहिती नाही. जी आता वेगळ्या प्रकारे समोर आली आहे. महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी तिनं पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उर्वशी चर्चेतही आली आहे. इराणीयन महिलांसाठी तिची आग्रही भूमिका अनेकांच्या कौतूकाचा विषय ठरली आहे. नेटकऱ्यांनी उर्वशीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. एरवी कोणत्याही थिल्लर कारणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागणाऱ्या उर्वशीच्या या भूमिकेवर नेटकऱ्यांनी तिची प्रशंसाही केली आहे.

त्याचं झालं असं की, उर्वशीनं इराणी महिलांच्या समर्थनार्थ केसं कापून आपला विरोध दर्शवला आहे. आता त्या महिलांच्या देशात सर्वसामान्य लोकांबरोबरच बॉलीवूडचे सेलिब्रेटीही चमकले आहेत. त्यात उर्वशीच्या सहभागानं आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांची बाजू घेऊन त्यांच्यावतीनं आपली भूमिका परखडपणे मांडली आहे. त्याचे कौतूकही होत आहे. आपण केसं कापून त्या इराणीयन सरकारचा विरोध करत आहोत. त्यांनी ज्याप्रकारे महिलांवर अन्याय सुरु केला आहे ते पाहून त्यांची किव येते. हे सारं अमानुष असून त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे उर्वशीनं म्हटले आहे.

इराणमध्ये हिजाबवरुन लढाई सुरु आहे. अशातच देशात अशांततेचे वातावरण आहे. जगभरातून अनेकांनी इराणविषयी नाराजी व्यक्त केली असून त्या देशातील महिलांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यात बॉलीवूडच्या उर्वशीनं घेतलेला सहभाग हा अनेकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. उर्वशीनं केस कापून आपण त्या हिजाब सक्तीला विरोध करत असल्याचे म्हटले आहे. उर्वशीच्या चाहत्यांनी अभिनेत्रींचं कौतूक करत तिच्या भूमिकेसाठी प्रशंसा केली आहे.

Urvashi Rautela
Jaya Bachchan: 'एवढा राग येतो तर घरातून बाहेर पडू नका'? नेटकऱ्यांनी जयाजींना सुनावलं

यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा, मंदाना करिमी यांनी देखील इराणच्या त्या अमानुषपणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उर्वशीनं नाराजी व्यक्त केली आहे. तिनं इंस्टावरुन ते फोटो शेयर करुन त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी माझी केसं कापत आहे, इराणी लोकांनी दाखवलेली नैतिकता हे सारं प्रभावित करणारं आहे. वेळ आली ती आता ठोस भूमिका घेण्याची जी मी घेत आहे. असे तिनं म्हटलं आहे.

Urvashi Rautela
Vaishali Takkar Death: काय होतं वैशालीच्या डायरीत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.