Urvashi Rautela: उर्वशीच्या नशीबात हा ऋषभही नाही? व्हायरल फोटोची कहाणी वेगळीच..

Urvashi Rautela
Urvashi RautelaEsakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी असं काहीतरी पोस्ट करते की त्याची बातमी होते आणि ती चर्चेत येते. मग ती पोस्ट काहीही असो. असचं तिने नुकतिच तिच्या इंस्टाग्रामला एक फोटो शेअर केला.

ज्यामध्ये ती अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसोबत दिसली होती.या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनमुळे बराच गोंधळ झाला. यात तिने 'कतारा 2 लोडिंग' असं लिहिलं होतं. तिने ऋषभला टॅगही केलं होतं. त्यामुळे चाहत्यांना वाटले की ती 'कांतारा 2' चा भाग असेल मात्र या फोटोमागची कहानी वेगळी आहे.

Urvashi Rautela
Bigg Boss 16 Grand Finale: 'आणि...'बिग बॉस 16'चा महाविजेता आहे..', फिनालेपूर्वी 'तो' व्हिडिओ व्हायरल

असं वृत्त आहे की, कांताराच्या प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला आहे की उर्वशी रौतेलाच्या 'कांतारा 2' मध्ये कास्टिंगची बातमी निराधार आणि खोटी आहे. उर्वशी रौतेला ज्या ठिकाणी होती तिथे ऋषभ शेट्टीही उपस्थित होता. तेव्हा अभिनेत्रीने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा ऋषभ शेट्टीनेही तिची नम्रपणे भेट घेतली. एकत्र फोटो क्लिक केले, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले. इथूनच अफवा सुरू झाल्या पण ती या चित्रपटाचा भाग नाही.

Urvashi Rautela
Bigg Boss 16: मनोरंजन अन् अ‍ॅक्शनचा तडका! फिनालेला स्पर्धकांवर पडणार 'बिजली'....
Urvashi Rautela
Bigg Boss 16 Finale: 'राजा माणुस हा दिलदार', शिवचं बिग बॉसकडून तोंड भरुन कौतुक

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर चाहते आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कांतारा2' ची अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत घोषणा केली आहे की 'कांतारा' हा सिक्वेल नसून प्रीक्वल असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()