Urvashi Rautela Gold Iphone: तुझा फोन माझ्याकडे, तो मी तुला देईल पण....अज्ञात व्यक्तीनं उर्वशीपुढे ठेवली अट

Urvashi Rautela Gold Iphone: नुकताच उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन गायब झाला आहे.
Urvashi Rautela Gold Iphone
Urvashi Rautela Gold IphoneEsakal

Urvashi Rautela Gold Iphone: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही चर्चेत आहे. ती नुकतीच अहमदाबादमध्ये झालेला भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती मात्र तिथे तिच्यासोबत असं काही झालं की तिची चर्चा सुरु झाली.

Urvashi Rautela Gold Iphone
Kundara Johny Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या सामन्या दरम्यान उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला. याबद्दल तिने स्वतः पोस्ट करुन माहीती दिली होती. उर्वशीने या चोरीप्रकरणी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीची प्रतही शेअर केली.

उर्वशीचा फोन शेवटचा अहमदाबादमधील एका मॉलमध्ये ट्रॅक करण्यात आला होता. त्यानंतर तिने आता तिचा फोन परत मिळावा म्हणून एक युक्ती केली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. इतकच नाही तर उर्वशीचा फोन तिला परत केल्यास ती त्या व्यक्तीला बक्षीस देईल असेही तिने सांगितले.

Urvashi Rautela Gold Iphone
Salim Khan : '....म्हणून सलमानसाठी मी कधीही स्क्रिप्ट लिहिली नाही', वडील सलीम खान यांनी काय सांगितलं कारण?
Urvashi Rautela iPhone
Urvashi Rautela iPhone

आता मात्र या घोषणेनंतर उर्वशीला एका अज्ञात व्यक्तीने फोन मॅसेज केला आहे. तिचा फोन त्या व्यक्तीला सापडल्याचा दावा करत त्याने उर्वशीकडे एक मागणी केली आहे.

उर्वशीने चॅटचा स्क्रिनशॉट शेयर केला आहे ज्यात त्या व्यक्तीनं उर्वशीला सांगितलं आहे की, "माझ्याकडे तुझा फोन आहे. तुला जर तो फोन परत हवा असेल तर तुला माझ्या कॅन्सर झालेल्या भावाला वाचवण्यासाठी माझी मदत करावी लागेल." त्यावर उर्वशीने थम दिला आहे.

Urvashi Rautela Gold Iphone
National Film Awards 2023: 'ती' साडी नेसण्यामागे आलियानं काय सांगितलं कारण? पोस्ट शेअर करुन वेधलं लक्ष

आता उर्वशीचा फोन त्या व्यक्तीकडे खरच आहे की कुणी तिची चेष्टा करत आहे हे तर उर्वशीच सांगू शकते मात्र तिचा फोन तिला परत मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे तर काहींनी उर्वशीचा मोबाईल हरवला नसल्याचे सांगितले. प्रसिद्धीसाठी उर्वशी हे सर्व करत असल्याचा आरोप करत तिला ट्रोल देखील करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com