Urvashi Rautela wore expensive necklace: उर्वशी रौतेला गुलाबी रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. अभिनेत्री जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण यावेळी उर्वशीच्या आणखी एका गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं.
ती गोष्ट म्हणजे उर्वशीचा नेकलेस..हा नेकलेस काही सर्वसाधारण नेकलेस नव्हता,तर तिनं मगरीच्या डिझाईनचा नेकलेस परिधान केला होता. आता उर्वशीच्या या ज्वेलरीची किंमत समोर आली आहे.
उर्वशीला हा मगरींचा नेकलेस गळ्यात घालणं मात्र भारी पडलं आहे. कारण ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे फोटो जसे समोर आले,तसं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. अनेकांना तिच्या गळ्यातल्या मगरी पाहिल्यावर त्या पाल आहेत असं आधी वाटलं. सोशल मीडियावर उर्वशीची जोरदार खिल्ली उडवण्यात आली.(Urvashi Rautela wore expensive necklace during cannes film festival 2023)
लोक भले उर्वशीला तिच्या या नेकलेसवरुन ट्रोल करत असतील पण त्याची किंमत आणि खासियत हैराण करणारी आहे, रिपोर्ट्सनुसार या नेकलेसची किंमत २०० करोड इतकी आहे. हा नेकलेस फ्रान्सच्या लग्झरी फर्म कार्टियारनं बनवला आहे आणि याला फक्त बनवण्यासाठी कंपनीनं २० मिलियन युरो म्हणजे १७९ करोड खर्च केले आहेत.
ओरिजनल नेकलेस कार्टियर ब्रान्डच्या आऊटस्टॅंडिंग कलेक्शन अॅंटिक ज्वेलरीचा पीस आहे. या नेकलेसला पहिल्यांदा २०१८ मध्ये सादर केलं गेलं होतं. या नेकलेसमधील एका मगरीला बनवतानाच एक हजारहून अधिक कट फॅन्सी यलो डायमंड्सचा वापर केला गेला आहे. यामध्ये १८ कॅरेट येलो गोल्डचा वापर केला गेला आहे.
नेकलेसमध्ये ६०.०२ कॅरेटचा वापर केला गेला आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या मगरीत १८ कॅरेट व्हाइट गोल्डचा वापर केला आहे आणि त्यांवर ६६.८६ कॅरेट वजनाचे पाचू लावले आहेत.
माहितीसाठी सांगतो की याच मगरींचा नेकलेस मॅक्सिकन अभिनेत्री मारा फेलिक्सनं देखील घातला होता. तिनं १९८० साली दोन मगरींचा नेकलेस घालून सगळ्यांना हैराण करून सोडलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.