Manipur Violence : मणिपूर घटनेवर अमेरिकेच्या गायिकेचे PM मोदींना समर्थन! म्हणाली, "तुमच्या स्वातंत्र्यासाठी..."

अमेरिकन गायिका मॅरी मिलबेनने मणिपूर घटनेवर मोदींना सपोर्ट केलाय
US singer Mary Millben supports PM Modi over Manipur issue
US singer Mary Millben supports PM Modi over Manipur issueSAKAL
Updated on

सध्या मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार सुरु आहे. दोन स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यामुळे भारतात संतापाची एकच लाट उसळली. मणिपूर हिंसाचारावर देशभरात पंतप्रधान मोदींना धारेवर धरलं गेलंय.

मोदींविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. अशातच अमेरिकन गायिका मॅरी मिलबेनने या घटनेवर मोदींना सपोर्ट केलाय. त्यांनी तुमच्या स्वातंत्र्यासाठी खुप काही केलंय, अशा शब्दात मिलबेनने मोदींना पाठींबा दिलाय.

(US singer Mary Millben supports PM Modi over Manipur issue)

US singer Mary Millben supports PM Modi over Manipur issue
Sindhutai Mazi Maai: “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान”, मालिकेच्या टीमतर्फे अनोखा उपक्रम

काय म्हणाली गायिका मिलबेन?

गायिक मिलबेन म्हणाली की, भारताचा आपल्या नेत्यावर विश्वास आहे आणि ती मोदींसाठी प्रार्थना करत आहे. याशिवाय तिने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या 'लेट फ्रीडम रिंग' मधल्या विधानाचाही उल्लेख केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर तिने एका पोस्टमध्ये लिहिले,

भारताचा आपल्या नेत्यावर विश्वास आहे. भारतातील मणिपूरच्या माता, मुली आणि महिलांना न्याय मिळेल आणि पंतप्रधान मोदी तुमच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच लढत राहतील.

मिलबेनने विरोधी पक्षांवर केली सडकून टिका

याशिवाय मेरी मिलबेनने विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. लक्षात घ्या की या वर्षी जूनमध्ये मेरी मिलबेनने पंतप्रधान मोदी यांची अमेरिका दौऱ्यात भेट घेतली होती. वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये तिने भारताचे राष्ट्रगीत गायले, जिथे पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले.

यादरम्यान मेरी मिलबेनने 'जन गण मन' गाऊन सर्वांना चकित केले आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

US singer Mary Millben supports PM Modi over Manipur issue
Made In Heaven 2: एक दिवस आधीच रिलीज झालाय मेड इन हेवन 2, काय आहे वेबसिरीजची कथा? जाणुन घ्या

लोकसभेत पंतप्रधान मोदी मणीपूर घटनेबद्दल काय म्हणाले?

लोकसभेत काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी गुरुवारी उत्तर दिले. मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असं मोदी म्हणाले होते.

मोदी म्हणाले.. मणिपूरबाबत न्यायालयाने एक निर्णय दिला. त्याच्या बाजूने आणि विरोधात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हिंसाचाराचा काळ सुरू झाला. अनेकांनी आपली माणसे गमावली. महिलांवर गंभीर गुन्हे घडले. हे गुन्हे अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ईशान्येकडील राज्यांतील माता, भगिनी आणि मुलींना देश तुमच्यासोबत आहे, हे घर तुमच्यासोबत आहे, आम्ही मिळून हे आव्हान सोडवू आणि तेथे शांतता प्रस्थापित करू, असे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.