Usha Naik : 'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी अन् कुलकर्णी असतं तर....' प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक काय बोलून गेल्या?

उषा नाईक यांच्या 'त्या' मुलाखतीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Usha Naik Latest News
Usha Naik Latest Newsesakal
Updated on

Usha Naik Latest News: उषा नाईक हे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव. आपल्या अभिनयानं, नृत्यानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या उषा नाईक यांच्या वाट्याला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता आली. मात्र एका मुलाखतीमध्ये आता त्यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्या नेमकं काय म्हणाल्या हे आपण जाणून घेणार आहोत.

उषा नाईक यांच्या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास लपाछपी, राखणदार, हळदी कुंकू, पिंजरा, कलावंतीण सारख्या चित्रपटांमधून उषाजींनी आपली वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटविल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. टीव्ही मनोरंजन विश्वात देखील त्यांनी काही काळ काम केले आहे.

Usha Naik Latest News
Oscar 2024 Latest Updates : 'ऑस्कर'च्या ट्रॉफीची 'ती' खास गोष्ट माहितीये? ज्याच्या हाती येते ती बाहुली त्याला तब्बल....!

मराठीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेल्या उषा नाईक यांच्या त्या मुलाखतीतील वक्तव्य मात्र त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी उषा नाईक यांनी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्या निमित्तानं त्यांनी दिलेल्या मुलाखतींमधून वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. माझं आडनाव जर जोशी, देशपांडे किंवा कुलकर्णी असतं तर माझं आणखी कौतुक झालं असतं. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उषा नाईक यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या आजवरच्या भूमिकांविषयी विचारण्यात आले होते. तुमच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्या फारशा महत्वाच्या नव्हत्या. तुम्ही नेहमीच दुय्यम स्वरुपाच्या भूमिका केल्या. असं का..या प्रश्नावर उषाजींनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

Usha Naik Latest News
Oscar 2024 Updates : तब्बल १३ नामांकन असणारा 'ओपनहायमर' की 'पुअर थिंग्ज', कोण मारणार बाजी? 'ऑस्कर'ची उत्सुकता शिगेला!

उषाजी त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणतात की, मी नेहमीच स्पष्ट बोलत आले.त्याचा बऱ्याच अंशी मला तोटाही झाला. कित्येक प्रोजेक्टमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण एक गोष्ट जाणवली ती म्हणजे माझं आडनाव जर जोशी, देशपांडे, कुलकर्णी असतं तर माझं खूप कौतुक झालं असतं. हे मी असं यापूर्वी कधी बोलले नाही. पण आता बोलायला हरकत नाही. अशा शब्दांत उषा नाईक यांनी आपल्या मनातील भावना मोकळेपणानं व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.