कराड बँकेचा वापरला लोगो: सोनी लिव्हवर पुण्यात गुन्हा दाखल

जाणीवपूर्वक हा एफआयआर केला आहे, असा युक्तिवाद सोनीकडून करण्यात आला.
कराड बँकेचा वापरला लोगो: सोनी लिव्हवर  पुण्यात गुन्हा दाखल
Updated on

सोनी लिव्हवरील sony liv हर्षद मेहता harshad mehata या लोकप्रिय वेबसिरीजवरील web serise एका दृष्यामुळे अडचणीत आलेल्या सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रा लि कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनीवर सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

स्कॅम 1992 हर्षद मेहता स्टोरी या सोनी लाईव्ह एपवरील वेबसिरीजमध्ये एका दृष्यात कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा लोगो दाखविण्यात आला आहे. विना परवाना अशाप्रकारे बँकेचा लोगो प्रदर्शित केल्याचा आणि बँकेची बदनामी केल्याचा आरोप करत पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात बँकेने ट्रेडमार्क, आयपीसी,आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी सोनी पिक्चर्सने याचिका केली आहे. याचिकेवर न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. वेबसिरीज प्रक्षेपित करताना कोणत्याही प्रकारे कोणाच्याही हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा असे आम्ही स्पष्ट केले आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक हा एफआयआर केला आहे, असा युक्तिवाद सोनीकडून करण्यात आला. तसेच वेब सिरीजमध्ये असलेली बँक ऑफ कराड आहे आणि कराड बँकेशी याचा संबंध नाही, पोलीस अकारण आमच्यावर कारवाई करत आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला. न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी निश्चित केली आहे.

कराड बँकेचा वापरला लोगो: सोनी लिव्हवर  पुण्यात गुन्हा दाखल
ती पुन्हा आली, शिल्पा शेट्टी पुन्हा 'सुपर डान्सच्या सेटवर'
कराड बँकेचा वापरला लोगो: सोनी लिव्हवर  पुण्यात गुन्हा दाखल
ती रडली पण बोलली... 'पोराबाळांसाठी लढता आलचं पाहिजे'

हर्षद मेहताचा रोखे घोटाळा सन 1992 मध्ये उघड झाला होता आणि त्यावेळी बँक ऑफ कराडचा सहभाग उघड झाला होता. त्यानंतर बँक सन 1994 मध्ये बँक औफ इंडियामध्ये विलिन करण्यात आली होती. हर्षल मेहता स्टोरी ऑक्टोबरमध्ये 2020 ला प्रदर्शित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.