Ganesh Utsav 2023: “देवाला आवडणारा आवाज”, उत्कर्षने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दूर्मिळ व्हिडीओ सांगून जागवली आठवण

उत्कर्षने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा तू सुखकर्ता तू दुखहर्ता गाण्याचा दूर्मिळ व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहीली आहे
utkarsh anand shinde shared ganpati special video of her grandfather pralhad shinde
utkarsh anand shinde shared ganpati special video of her grandfather pralhad shindeSAKAL
Updated on

सध्या सगळीकडे गणपतीचा माहोल आहे. कोणाच्या घरी, कोणाच्या बिल्डींगमध्ये लाडका बाप्पा विराजमान झालाय. गणपती उत्सवानिमित्त सगळीकडे भक्तीमय माहोल असतो.

गणेशोत्सवात सगळीकडे हमखास वाजणारं गाणं म्हणजे तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता हे गाणं. प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातलं हे गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचं गाणं. याच गाण्याविषयी आणि गणेशोत्सवाच्या एकूणच सणाबद्दल प्रल्हाद शिंदेंचा नातू उत्कर्ष शिंदेने आठवणी जागवल्या आहेत.

(utkarsh anand shinde shared ganpati special video of her grandfather pralhad shinde)

utkarsh anand shinde shared ganpati special video of her grandfather pralhad shinde
Prakash Raj: सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी

उत्कर्षने प्रल्हाद शिंदेंचा तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता गाण्याचा दुर्मिळ व्हिडीओ शेअर करुन लिहीलंय की, “देवाला आवडणारा आवाज” तूच सुखकरता तूच दुःख हरता..
आज सकाळीच हे गाणं ऐकूण झालं. गणपतीचा माहोल बनवायचा म्हटलं की हे गाणं तर झालंच पाहीजे. कैकदा भेटणारे चाहते ह्या गाण्याच्या आठवणी सांगतात.

उत्कर्ष शिंदे पुढे लिहीतात, "आमच्‍या लहानपणी आमच्‍या कोकणात घरा समोर झाडांच्‍या बागा आवत्‍ती भवती रान घनदाट झाडी,आणि मग दूरवर दुसर घर.पण ह्यात सुधा सन् आले की सर्वांना एकत्रित करणारा एक आवाज कानी पडायचा. तुच्‍च सुख कर्ता तुच्‍छ दुख हर्ता, आता तरी देवा मला पावशील का? ते ऐका सत्यनारायणाची कथ्था. पिढ्यानपिढ्या जिवंत असलेला हा आवाज आजही यूट्यूब,इन्स्टा रिल्स मधून युवा पिढीला भुरळ घालतोय."

utkarsh anand shinde shared ganpati special video of her grandfather pralhad shinde
Sankarshan Karhade: "पायलटच्या केबिनमध्ये शिरलो आणि मग पुढे...", संकर्षणचा विमान प्रवासाचा भन्नाट अनुभव

आजोबा प्रल्हाद शिंदेंच्या आवाजाबद्दल उत्कर्ष पुढे लिहीतो, "प्रल्हाद शिंदेंच्या गाठीशी पैसा अवार्ड जरी कमी आला असला तरीही.सर्व जाति धर्मातील प्रेक्षाकांच प्रेम हे सर्वात जास्त लाभलेले त्त्यांच्या सारखे बोटावर मोजण्या इतकेच असतील.ह्या गळ्याने शास्त्रीय बाज जरी जपला नसला तरी वयूंशपरंपरागत गळ्यातून येणारा करेक्ट सूर मात्र त्यांनी सांभाळला होता. मानवी मनाला आध्यात्माकडे खेचून आणणार हा आवाज .घरातले सासू सुनेचे वाद असो किवा नात्यांची गमत सांगणार गाण असो .लोकगीतांचे सामने ते रेकॉर्ड ब्रेक करणारी वैविध्यपूर्ण अशी गाणी.त्यांच्या बरोबर काम केलेली मंडळी सांगतात वरच्या पटीत गातांना जिथे इतर गायकांचा श्वास आवाज संपायचा तिथे प्रल्हाद शिंदेंची तान सुरु व्हायची. लहानग्यांपासुन ते वयवृद्धनाही अपलासा वाटणारा हा आवाज. मेळ्यात,चौकात,बजरात,भजनात,पारायणात, सप्‍ताहात ते घरातील देवघरात जाऊन पोहोच्‍लेला प्रल्हाद शिंदेंचा हा आवाज जो अजरामर होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.