महाराष्ट्राच्या लोकसंगीतातलं(Folk Music) मोठं घराणं म्हणजे शिंदे घराणं(Shinde Family)...या घराला लोककलेचा,लोकसंगीताचा मोठा वारसा लाभलेला. प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे आणि त्यांची पुढची पिढी आदर्श शिंदे,उत्कर्ष शिंदे यांच्यापर्यंत साऱ्यांनीच आपलं नाव केवळ महाराष्ट्रापुरतं सिमीत न ठेवता जगात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. भक्तीगीत,कोळीगीते, भीम गीत,,कव्वाली आणि लोकगीत अशा संगीताच्या विविध प्रकारांवर त्यांनी आपलं नाव कोरलंय. आजही अनेक समारंभात उत्साहानं प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदेंची गाणी वाजतात अनं त्यातील चैतन्य प्रत्येक मनाला नवी उर्जा देतं. आदर्शनं एक पाऊल पुढे जात सिनेसंगीतावरही आपला ठसा उमटवत तिथेही आपलं स्थान मजबूत केलं आहे.(Utkarsh Shinde Post-World record Community)
शिंदे घराणं अन् लोकसंगीत हे जणू एक समीकरण बनून गेलं आहे. त्यांनी गायलेली गाणी प्रत्येकाला आपल्या तालावर ताल धरायला लावतात हे १०० टक्के. शिंदे घराण्याची आजची पिढीही लोकसंगीतात तितकीच सक्रिय पहायला मिळते. नुकतंच शिदे कुटुंबाचं नाव जगाच्या पटलावर नवा रेकॉर्ड करून गेलं आहे. शिंदे घराण्याचं नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झालं आहे. यासंदर्भातील एक पोस्ट उत्कर्ष शिंदे यानं केली आहे.
उत्कर्ष शिंदे यानं केलेल्या पोस्टनुसार २३ जून,२०२२ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदे कुटुंबाला 'मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन फॅमिली' हा सन्मान प्राप्त झाला आहे. उत्कर्ष शिंदे यासंदर्भात केलेल्या पोस्टनंतर शिंदेशाही कुटुंबावर कौतूकाचा वर्षाव पहायला मिळत आहे.
उत्कर्षनं वर्ल्ड रेकॉर्डची पोस्ट करताना लिहिलं आहे की,''23जून 2022 काल माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे ह्यांची 18वी पुण्यतिथी .आणि कालच जागतिक दर्जा चे 'वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी' तर्फे शिंदेशाही परिवाराचे नाव 'वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी'च्या यादीत विराज मान झाले .कालच्या दिनी हि सर्वात मोठी आदरांजली मी मानतो .शिंदेशाही परिवाराला हे मिळालेले यश हे फक्त तुम्हा रसिकजनामुळे ,आमच्या सोबत काम करणाऱ्या एकूण एक कलाकारा मुळे ,आमच्या वर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे असे आम्ही मानतो .आम्हाला मिळालेले हे वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचा मान सन्मान मी सर्व महापुरुषांच्या चरणी सादर करतो .आपण होतात आपण लढलात म्हणून आम्ही घडलो . #shindeshahi#WorldRecordCommunity''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.