Uttarkashi Tunnel Rescue Bollywood Reaction: उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजूरांना बाहेर काढण्यामध्ये अखेर यश आलं आहे. 12 नोव्हेंबरला हे कामगार बोगद्यात अडकले होते. या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते.
तब्बल १७ दिवसांनी कामगारांनी मोकळा श्वास घेतला आहे. कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता सर्व स्तरावरुन यावर प्रतिक्रिया येण सुरु झालं आहे.
त्याचबरोबर या मजुरांना वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमचे लोक आभार मानत आहे. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत उत्तरकाशी टनल रेस्क्यू ऑपरेशननंतर आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.
ज्यात खिलाडी अक्षय कुमार , रितेश देशमुख, अनुपम खेर अशा अनेक कलाकारांच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमार हा प्रत्येक समस्येवर आपली प्रतिक्रिया देत असतो. त्याने टनल रेस्क्यू ऑपरेशन पुर्ण झाल्यानंतर तेथे अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल रेस्क्यू टिमचे आभार मानले.
अक्षय आपल्या ट्विट लिहितो की, '41 अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आल्याचे कळताच मला आनंद आणि दिलासा मिळाला आहे. बचाव पथकातील प्रत्येक सदस्याला माझा सलाम. तुम्ही खूप छान काम केले आहे. हा नवा भारत आहे आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. जय हिंद'.
रितेश देशमुख
रितेश देशमुखने देखील या बचाव कार्याचा फोटो ट्विटवर शेअर केला आणि लिहिले, 'ब्रावो!!! गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या बचाव पथकाला सलाम. कुटुंबांच्या आणि देशाच्या प्रार्थनांचे उत्तर...गणपती बाप्पा मोरया #UttarakhandTunnelRescue #UttarakshiRescue'.
अनुपम खेर
तर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही उत्तरकाशी टनल रेस्क्यूचा फोटो शेअर लिहिले की, 'भारत माता की जय!
केआरके
अनेकदा आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्तेत राहणाऱ्या केआरकेने उत्तरकाशी बचावकार्यानंतर टिमचे कौतुक त्याने शेयर केले आहे. यात ते लिहितो, '41 मजुरांचे प्राण वाचवणाऱ्या बचाव पथकाला सलाम. विशेषतः रॅट मायनर्सचे पर्यवेक्षक वकील हसन. #UttarakhandTunnelRescue #UttarakshiRescue'
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चननेही ट्विट करत बचाव कार्यात सहभागी असलेले सर्व टिम आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या आमच्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी सर्व बचाव कर्मचार्यांना आणि सर्व एजन्सींना खूप कृतज्ञता आणि मोठा सलाम. जय हिंद.'
जॅकी श्रॉफ
जॅकी श्रॉफने आपल्या पोस्टमध्ये 22 एजन्सींचे आभार मानत लिहिले की, 'उत्तरकाशी बोगद्यातून सर्व ४१ कामगारांची सुटका करण्यात आली. NDRF, BRO, भारतीय सेना, भारतीय वायुसेना, NHIDCL, SJVNL, THFCL, RVNL, ONGC, कोल इंडिया आणि इतरांसह बचाव कार्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या 22 एजन्सींचे आभार.
निमृत कौर
तर निमृत कौरने लिहिले, 'सर्व अडकलेल्या मजुरांना वाचवल्याबद्दल एनडीआरएफ, आर्मी, अभियंत्यांसह सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांचे अभिनंदन आणि सलाम. शेवटी देवाच्या कृपेने मला खूप दिलासा आणि आनंद मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.