कोल्हापूर: ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...’, ‘कशी नशीबानं थट्टा आज मांडली...’, ‘मला लागली कुणाची उचकी...’ अशा सदाबहार गाणी आणि लावण्यांच्या सुरेल आविष्काराने सजलेल्या ‘पिंजरा’(Pinjara) या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला प्रारंभ झाला आहे. ५० वर्षांनंतरही व्ही. शांताराम( V. Shantaram Movies) यांचा हा चित्रपट आणि त्यातील जगदीश खेबुडकर Jagdish Khebudkar) यांची गाणी साऱ्यांनाच भुरळ घालत आहेत. २०१६ ला या चित्रपटाला नवा डिजिटल लूक मिळाला असून ‘यूट्यूब’वरही हा चित्रपट सर्वांसाठी खुला आहे.
v. shantaram pinjara movies 50 year completed memory kolhapur marathi news
दरम्यान, येथील प्रा. डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांनी नुकतीच ‘व्ही. शांताराम आणि डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटाचा सांस्कृतिक प्रभाव- एक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांनी सहा जिल्ह्यातील तीनशेहून अधिक विविध वयोगटातील रसिकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातूनही ‘पिंजरा’ आजही तितकाच टवटवीत आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट असल्याची स्पष्ट मते अनेकांनी नोंदवली आहेत.
‘गीत गाया पत्थरोने’ चित्रपटानंतर शांतारामबापूंच्या चित्रपटांना फारशे यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपट तयार करायचे ठरवले. अनंत माने, शंकर पाटील असे अस्सल ग्रामीण कथांवर चित्रपट गाजविणाऱ्या दिग्दर्शक आणि लेखकांची मदत घेतली. जोडीला संगीतकार राम कदम होतेच. एका आदर्श शिक्षकाची एक तमाशा कलावंतीण कशी वाट लावते, या कथानकावर आधारित हा चित्रपट. मास्तरांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू तर संध्या प्रमुख नायिका.
चित्रपटाच्या कथेला बहारदार गाणी आणि संगीताची जोड मिळाली आणि १९७२ ला ‘पिंजरा’ चित्रपट साकारला गेला. पुण्यातील प्रभात सिनेमागृहात तो प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. कारण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बहुतांश गाणी रेकॉर्डच्या दुकानात वाजू लागली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ती अक्षरशः घराघरात गुणगुणली जावू लागली. तत्कालीन बॉलीवूडच्याही अनेक बिगबजेट चित्रपटांपेक्षाही ‘पिंजरा’ने तिकीट खिडकीवरही बाजी मारली.
‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपटात अनंत माने यांनी पहिल्यांदा संधी दिली आणि पुढे त्यांच्या अनेक चित्रपटात हमखास भूमिका मिळाल्या. ‘पिंजरा’चित्रपटाच्या निर्मितीतही अनंत माने यांचे मोठे योगदान होते आणि चित्रपटाने पंचवीस आठवडे पूर्ण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात व्ही. शांताराम यांनीही त्याबाबतच्या आठवणी सांगितल्या होत्या.
- भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते
v. shantaram pinjara movies 50 year completed memory kolhapur marathi news
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.