Vaishali Takkar Suicide Case: अखेर पोलिसांच्या तावडीत वैशालीचा आरोपी, असा रचला होता सापळा...

वैशाली ठक्करनं तिच्या सुसाइड नोटमध्ये एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानीमुळं आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.
Vaishali Takkar suicide case big update-know how the accused rahul navlani arrested by police big plan
Vaishali Takkar suicide case big update-know how the accused rahul navlani arrested by police big planGoogle
Updated on

Vaishali Takkar Case Update: टी.व्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येच्या केस प्रकरणात इंदौर पोलिसांनी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला अटक केल्यानं आता केसला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिस राहुल नवलानीची चौकशी करत आहेत आणि त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की राहूल हा इंदौर आणि देवास दरम्यान असलेल्या एका ढाब्यात लपून बसला होता. वैशाली ठक्करचा एक्स-बॉयफ्रेंड राहूल नवलानी तिच्या आत्महत्येनंतर लगेचच फरार झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील फरार झाली होती.(Vaishali Takkar suicide case big update-know how the accused rahul navlani arrested by police big plan)

Vaishali Takkar suicide case big update-know how the accused rahul navlani arrested by police big plan
Vaishali Takkar Suicide: '...नाहीतर माझ्या आत्म्यास शांती मिळणार नाही, वैशालीच्या सुसाईड नोटनं खळबळ

वैशालीनं १५ ऑक्टोबरला इंदौर येथील आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. घटनास्थळी वैशालीची सुसाईड नोटही पोलिसांना सापडली होती,ज्यात राहूल नवलानी आणि त्याच्या पत्नीनं वैशालीला मानसिक तसंच शारिरीक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यानंतर जेव्हा पोलिस राहूल नवलानीचा तपास सुरु करत त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घराला कुलूप लावलेलं दिसलं. पोलिस त्याच्या घरी पोहोचण्याआधीच तो फरार झाला होता. वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर ४ ते ५ दिवसांच्या आतच पोलिसांनी आपल्या हुशारीनं राहुल नवलानीला ताब्यात घेतलं. राहुल नवलानीला पकडण्यासाठी इंदौर पोलिसांनी तगडा प्लॅन आखला होता.

Vaishali Takkar suicide case big update-know how the accused rahul navlani arrested by police big plan
Vaishali Takkar Suicide: कोण आहे राहूल नवलानी, ज्याच्या धमक्यांनी वैशालीचं जगणं अशक्य केलं होतं...

वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्या केसमधील संशयीत फरार आरोपी राहुल आणि त्याची पत्नी यांच्या तपासासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. त्या टीमना वेगवेगळ्या राज्यात तपासासाठी पाठवण्यात आलं. आणि याची कल्पना कोणालाच दिली गेली नाही,हे सगळं खूप गुप्तपणे करण्यात आलं. पोलिसांच्या तिन्ही टीम वैशालीच्या या केसम्ध्ये पहिल्या दिवसापासूनच अॅक्शन मोडमध्ये होत्या. फरार आरोपाींना काहीही करुन पोलिसांना पकडायचं होतं. त्यासाठी मोठी व्यूहरचना आखून त्यानुसार पाऊलं उचलली गेली आणि टीम बनवल्या गेल्या.

पोलिसांच्या या तिन्ही टीम महाराष्ट्र,गुजरात आणि राजस्थानमध्ये पाठवल्या गेल्या. याव्यतिरिक्त पोलिसांनी या आरोपीं विरोधात एक सर्क्युलर नोटीस देखील जारी केलं आणि यांच्या संदर्भात माहिती देणाऱ्यास ५ हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं गेलं. पोलिसांनी घोषणेत नमूद केलं होतं की,या दोन आरोपीं विषयी माहिती देणाऱ्यास ५ हजार रुपयाचं बक्षिस दिलं जाईल आणि माहिती देणाऱ्याविषयी गुप्तता पाळण्यात येईल.

पोलिसांनी राहुलला पकडल्यानंतर सांगितलं आहे की वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर राहुलनं लपण्यासाठी अनेक ठिकाणं बदलली. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नव्हता. पोलिसांच्या सांगण्यानुसार,राहुल इंदौर आणि देवास दरम्यान असलेल्या एका ढाब्यात लपला होता. पोलिसांनी राहुलला पकडण्यासाठी टेक्निकल सर्विलान्सची मदत घेतली. बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळाली की राहुल देवासहून इंदौरच्या दिशेनं प्रवास करत आहे. बस्स.. आरोपी पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला आणि लगेचच पोलिसांनी चेकिंग पॉइंटना अलर्ट जारी केलं आणि त्याला पकडलं.

डी.सी.पी जोम अमिल तोलानी यांनी सांगितलं की, वैशाली ठक्कर आत्महत्ये प्रकरणातील आरोपी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी यांच्यावर आयसीपी अॅक्ट ३०६ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. ही केस वैशाली ठक्कर हिच्या पाच पानी सुसाइड नोटच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. राहुलवर वैशालीचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्याचा आरोप आहे. त्यासोबतच,राहूलवर दोनदा वैशालीचं लग्न मोडण्याचा,तिला धमक्या देण्याचा देखील आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.