बॉक्सऑफिसवर(Boxoffice) गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमांचाच बोलबाला आहे. आधी कोरोनामुळे बॉक्सऑफिस कलेक्शनला मोठा झटका बसला होता. त्याचं नुकसान दाक्षिणात्य सिनेमे भरुन काढताना दिसतायत. संपू्र्ण भारतभरात आता दाक्षिणात्य सिनेमे मोठ्या आवडीनं पाहिले जातायत असं चित्र सध्यातरी निर्माण झालेलं दिसत आहे. बॉलीवूडला कडवी टक्कर देत दाक्षिणात्य सिनेमांनी महाराष्ट्रातही आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. आधी 'बाहुबली' त्यानंतर 'केजीएफ २' हिंदी भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर तर बॉलीवूडच्या रिअल हिंदी सिनेमांचे धाबे दणाणलेले आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-द राइज' सिनेमानं तर यावर कळसच चढवत आपल्या हिंदी व्हर्जनमध्ये तब्बल १०० करोडोची कमाई केली. आता याच करोडोच्या क्लबमध्ये दाक्षिणात्य स्टार अजितचा 'वलीमई' सिनेमा देखील सामिल होण्याच्या तयारीत आहे. प्रदर्शनानंतरचा या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता आता अपेक्षा अणखी उंचावल्या आहेत. केवळ तीन दिवसात या सिनेमानं जगभरातून म्हणे १०० करोडोची कमाई केल्याचं बोललं जात आहे.
अजितच्या 'वलीमई' मध्ये त्याच्यासोबत हुमा कुरेशी,कार्तिकेय आणि सुमित्रा असे कलाकारही आहेत. २४ फेब्रुवारीला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बोललं जात आहे की हा सिनेमा 'पुष्पा'चा रेकॉर्ड तोडणार. 'वलीमई' चांगला सिनेमा असला तरी अजून 'पुष्पा'चा रेकॉर्ड तोडण्यासाठी त्याला मोठा प्रवास करावा लागणार आहे. 'वलीमई' हा अॅक्शन सिनेमा आहे. यात अजित कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन एच.विनोथ यानं केलं आहे. सिनेमातल्या जाणकराचं म्हणणं आहे की,सिनेमागृहात ५० टक्के आसनक्षमता असूनही वलीमाई ने पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर केलेलं तगडं कलेक्शन ही जमेची बाजू आहे. पहिल्याच दिवशी सिनेमानं जागतिक स्तरावर ५० करोड कलेक्शन केलं आहे. मात्र वीकेन्ड संपताना बॉक्सऑफिस कलेक्शन खाली गेलेलं दिसलं. हुमा कुरेशीनं देखील सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला घेऊन एक पोस्ट केली होती. यात तिनं जगभरातनं सिनेमाचं १०० करोडचं कलेक्शन झालं आहे असं लिहिलं होतं.
पण 'पुष्पा'च्या तुलनेत अजून 'वलीमई' बराच मागे आहे. 'पुष्पा-द राइज' सिनेमानं ५ दिवसांत १७० करोड कमाई केली होती. 'वलीमई'साठी 'दिल्ली अभी दूर है', असं सध्यातरी म्हटलं जात आहे. 'वलीमई' त्याच्या हिंदी व्हर्जनसाठी चमक दाखवू शकली नाही. अल्लू अर्जुनची 'पुष्पा' मात्र हिंदी भाषिकांमध्ये कमाल करुन गेली होती. 'वलीमई' नं हिंदी भाषेत पहिल्या दिवशी फक्त २० लाख रुपये कमावले. आतापर्यंत एकूण ३५ लाख रुपये एवढीच कमाई झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.