Varthur Santosh: एक चूक आणि थेट बिग बॉसच्या घरातूनच स्पर्धकाला अटक! काय आहे प्रकरण

बिग बॉसमधील स्पर्धकाला याप्रकरणी बिग बॉसच्या घरातुन पोलिसांनी ताब्यात घेतलंय
Varthur Santosh who has been arrested from the set of  Kannada Big Boss was seen in possession of tiger claw
Varthur Santosh who has been arrested from the set of Kannada Big Boss was seen in possession of tiger claw Esakal
Updated on

Varthur Santosh Arrest News: सध्या बिग बॉस हिंदी सोबतच बिग बॉस कन्नडाचा नवीन सीझन सुरु आहे. बिग बॉस कन्नडा मधून एक मोठी बातमी समोर आलीय.

बिग बॉस कन्नडा मध्ये सहभागी असलेला स्पर्धक वरथूर संतोषला बिग बॉसच्या घरामधूनच अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

(Varthur Santosh who has been arrested from the set of Kannada Big Boss)

Varthur Santosh who has been arrested from the set of  Kannada Big Boss was seen in possession of tiger claw
Prasad - Amruta: "चांदीच्या ताटात पुरणपोळी..", देशमुख कुटुंबाने केलं प्रसादचं केळवण, अमृताने घेतला खास उखाणा

वाघाच्या पंजाचे लॉकेट घातल्याप्रकरणी स्पर्धक वरथूर संतोष याला वनविभागाने अटक केली. वाघाची नखे वापरणे कायद्याच्या विरोधात आहे. वाघाचे पंजे कोणी विकू किंवा विकत घेऊ शकत नाही.

शो दरम्यान वरथूरने एक लॉकेट घातले होते. जे कॅमेऱ्यात कैद झाले. हे लॉकेट वाघाची नखं आणि पंजाचा वापर करुन तयार करण्यात आल्याचे लक्षात येताच त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला. ज्यामुळे वन अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

वनविभागा अधिकारी काल (२२ ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा बिग बॉसच्या घरात पोहोचले. पुढे त्यांनी बाहेरुनच वरथूरने घातलेलं सोन्याचं लॉकेटची तपासणी केली.

तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी ते अस्सल वाघाचे पंजे असल्याचं आढळलं. त्यानंतर त्यांनी बिग बॉसच्या आयोजकांना स्पर्धक वरथूरला त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले. आणि पुढे त्यांनी वरथूरला ताब्यात घेतले. (Latest Entertainment News)

Varthur Santosh who has been arrested from the set of  Kannada Big Boss was seen in possession of tiger claw
Dharmaveer 2: आणि टेंभीनाक्यावर आनंद दिघे पुन्हा अवतरले, लोकांचा डोळ्यावर विश्वास बसेना, व्हिडीओ व्हायरल

दोषी आढळल्यानंतर काही तासांनंतर वरथूर संतोष बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आणि वनविभागाने त्याला अटक केली.

संतोषला अटक करताना डीसीएफ उपवनसंरक्षक रवींद्र कुमार यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "त्याने वाघाचे पंजे घातलेले दिसल्यानंतर सार्वजनिक तक्रार दाखल झाली. तक्रारीनंतर आम्ही कोमाघट्टाजवळील बिग बॉस स्टुडिओमध्ये त्याची पाहणी करण्यासाठी गेलो. काही वेळ आढेवेढे घेतल्यानंतर वरथूरने आम्हाला लॉकेट देण्याचे मान्य केले." (Latest Marathi News)

रवींद्र कुमार यांनी पुढे सांगितले, "मी योग्य प्रक्रियेद्वारे सोनेरी लॉकेटची तपासणी केली. जेणेकरून तो खरा वाघाचा पंजा आहे की नाही हे आम्हाला कळू शकले. आम्ही पुढे बिग बॉसच्या अधिकाऱ्यांना त्याला आमच्यासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. मी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने कबूल केले. तीन वर्षांपूर्वी होसूर येथे त्याने हे लॉकेट खरेदी केले होते. कॅमेऱ्यासमोर मान्य केल्यानंतर आम्ही त्याला रात्री साडेआठच्या सुमारास अटक केली. हे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे उल्लंघन आहे. वाघ ही अत्यंत धोकादायक प्रजाती मानली जाते."

या प्रकरणात वरथूर याला तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.