Ved Movie: रितेशच्या 'वेड'चं गाणं लीक?, निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

Ved Movie
Riteish Deshmukh
Ved Movie Riteish DeshmukhEsakal
Updated on

ved marathi movie romantic song leak: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे सध्या त्याच्या 'वेड' या चित्रपटामूळे चर्चेत आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'वेड'चा टीझर शेअर केला आहे. त्याच्या टिझरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर रितेशने सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या गाण्याच्या काही ओळी टिझरमध्ये ऐकल्यापासूनच या गाण्याची सर्वत्र चर्चा होत होती. त्यातच आता गाणे लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.

'वेड' चित्रपटचं टायटल सॉंग हे आज म्हणजे मंगळवारी प्रदर्शित होणार होते. पण हे गाणं अधिकृतपणे प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मिडियाच्या यूट्यूबवर लीक झाल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटातील हे पहिलंच रोमॅंटिक गाणं आहे. या गाण्याला आता पर्यंत या गाण्याला सहा हजाराहून अधिक व्ह्युज आले आहे. या गाण्यात रितेश देशमुख आणि जिया शंकर दिसत आहे. हे गाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय- अतुलने गायले आहे.

Ved Movie
Riteish Deshmukh
Ved Teaser: रितेशचा 'वेड' तेलगू चित्रपटाची कॉपी...

गाणं लिक झाल्याच्या चर्चा सर्वत्र होत असतांनाच चित्रपटच्या निर्मात्यांकडून स्पष्टीकरण आलं आहे. सकाळशी बोलतांना त्यांनी दावा केलाय की ओरिजनल गाणं हे या लीक गाण्यापेक्षा पुर्णपणे वेगळे आहे. ते आज प्रदर्शित होणार आहे. त्यामूळे दावा करण्यात आलेलं गाणं हे वेड चित्रपटातील गाण्यापेक्षा वेगळे आहे. गाणं लीक होण्याच्या बातम्या ह्या अफवा असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय- अतुलने यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांच्या मोहक आवाजाने नक्कीच चाहते मंत्रमुग्ध होतील. त्याच्या जोडिचे अनेक मराठी गीत हिट झालेले आहे. या गाण्याच्या टिझर ऐकल्यानंतर प्रेक्षकांना सैराट चित्रपटांच्या गाण्याची आठवण झाली आहे. त्यामूळे सैराट प्रमाणे वेड चित्रपटातील गाणे आणि चित्रपट हिट होइल यात काही शंकाच नसल्याचं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत तर या चित्रपटाद्वारे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()