बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि बघबघता या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः जादू केली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 'वेड'ने विक्रमी कमाई केली असून एका आठवड्यातच 20 कोटींचा गल्ला कामावला आहे.
(Ved Movie Box Office Collection 20 crore business in one week riteish deshmukh genelia D'souza deshmukh)
रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही जादूच केली आहे.
या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेड चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रोहीत शेट्टीचा 'सर्कस' आणि जेम कॅमेरूचा 'अवतार २' हे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले, पण 'वेड'ला मिळाणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, थेटर मालकांनी चक्क या दोन्ही चित्रपटांचे शो थांबवल्याचं दिसून आलं आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २० कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
चित्रपट समीक्षत तरण आदर्शने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘वेड’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ने बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकलं आहे, असे ते म्हंटले आहे.
पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर पकड निर्माण केली होती. पहिल्या दिवशी म्हजेच गेल्या शुक्रवारी चित्रपटानं २.२५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी या आकडा वाढला, चित्रपटाची ३.२५ कोटींची कमाई झाली होती. तिसऱ्या दिवशी ४.५० कोटी, चौथ्या दिवशी ३.०२ कोटी तर पाचव्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे २.६५ कोटींचा गल्ला जमल्याचं समोर आलं. सहाव्या दिवशी चित्रपटानं २.४५ कोटींची कमाई केली.तर एका आठवड्याच चित्रपटानं एकूण २०.६७ कोटीं कमावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.