bigg boss 16: सध्या बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वाची बरीच चर्चा आहे. या पर्वात तोडीस तोड स्पर्धक दाखल झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या पर्वात विजेता ठरलेला शिव ठाकरेही यंदा हिंदी बिग बॉस मध्ये सामील झाला आहे. अत्यंत ताकदीने खेळणारा शिव बिग बॉस 16 मध्येही विजयी होईल असे अनेकांना वाटत आहे. पण काल तो काहीसा हतबल झालेला दिसला. घरच्यांच्या आठवणीत तो रडू लागला. पण याच वेळी एक मोठा ट्विस्ट आला.. शिव आणि वीणा ह्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त केले आहे, आणि सध्या त्याचीच चर्चा आहे.
(Veena Jagtap shared feelings for shiv thakare bigg boss 16)
शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये आपली दमदार खेळी दाखवत आहे. त्याने तिथेही प्रेक्षकांची मनं जिंकली असून अनेकांना तो विजेता वाटत आहे. असे असतानाच अचानक घरात शिव ठाकरे ढसाढसा रडला. घरात सुरू असलेल्या वादावादीमुळे तो स्वत:ला एकटं समजत होता. मात्र यावेळी बिग बॉसने स्वतःहून विचारलं.. तुला वीणाशी बोलायचं आहे का? आणि शिव भावूक झाला.
बिग बॉस त्याला म्हणत आहेत,"तुला कोणासोबत बोलायचं आहे? वीणाशी का? यावर हसत उत्तर देत शिव म्हणत आहेत,"आईही चालेल आणि वीनीही चालेल". पुढे शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वीणाने देखील हा व्हिडीओ शेअर करत शिवला धीर दिला आहे. व्हिडीओ शेअर करत वीणाने लिहिलं आहे,"वाघ आहेस तू...रडू नाही अजिबात...मी आहे सोबत नेहमी". असं म्हणत वीणाने शिवसाठी प्रेम व्यक्त केलं आहे.
वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) म्हणजे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील लोकप्रिय जोडी. घरात त्यांची केमिस्ट्री जुळलीच शिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. वीणाने शिवसाठी केलेला टॅटूही पुसला. शिवाय त्यांचे ब्रेक अप झाल्याचीही कबुली दिली होती. पण आता दोन वर्षांनी वीणाने शिववरचं प्रेम पुन्हा व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.