ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मंगळवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून आयसीयूमध्ये त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. (Dilip Kumar hospitalised after complaining of breathlessness currently in ICU)
'दिलीप कुमार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना याआधी जाणवलेला श्वसनाशी संबंधित त्रास पुन्हा जाणवतोय. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार व्हावेत, असा विचार कुटुंबीयांनी केला. आज पुन्हा एकदा त्यांची प्रकृती तपासून कोणते उपचार करावेत याचा निर्णय घेतला जाईल. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवता यावं यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही काळजी करू नका', अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना दिली.
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांच्यावर प्लुरल अॅस्पिरेशनची यशस्वी प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती ९ जून रोजी ट्विटरद्वारे देण्यात आली होती. त्यांचे निकटवर्तीय फैजल फारुखी यांनी प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले होते. दिलीप कुमार यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनचा त्रास होता आणि त्यावर डॉक्टर उपचार करत होते. दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत पत्नी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी पसरणाऱ्या कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.