दिलीप कुमार यांनी पुण्यातील कॅन्टीनमध्ये केलंय काम

dilip kumar
dilip kumar
Updated on
Summary

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 98 व्या वर्षी निधन झाले आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे सुरुवातीचे आयुष्य खडतर होते

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 98 व्या वर्षी निधन झाले आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे सुरुवातीचे आयुष्य खडतर होते. त्यांना एकूण 11 भाऊ-बहीण होते. दिलीप कुमार आणि त्यांचे सर्व बहीण-भाऊ त्यांच्या वडिलांना घाबरायचे. एकदा एका छोट्याशा गोष्टीमुळे त्यांचे वडील त्यांच्यावर रागावले आणि याने दिलीप कुमार यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. (veteran actor Dilip Kumar paases away worked in Pune canteen)

दिलीप कुमार यांच्या आत्मकथेत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यात दिलीप यांनी लिहिलंय की, मला नीट आठवत नाही. मी तरुण असेन तेव्हा आगाजी (वडील) एका किरकोळ कारणामुळे माझ्यावर रागवले. त्यानंतर मीही रागात घर सोडले. त्यावेळी दुस-या महायुद्धाला सुरुवात झाली होती. (दुसरे महायुद्ध सप्टेंबर १९३९मध्ये सुरु झाले होते.) युद्धामुळे आमच्या व्यवसायाला बराच फटका बसला होता. बहिणींचीही लग्न करायची होती. त्यामुळे आर्थिक अडचण दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. जोपर्यंत मला काम मिळत नाही तोपर्यंत मी घरी न जाण्याचा निर्णय मनाशी ठाम केला होता.

dilip kumar
कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत

पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचलो तेव्हाही मी घाबरलेला होतो. आगाजी माझ्यावर का रागावले याचे कारण मला कळत नव्हते. पुणे मुंबईपासून दूर असल्यामुळे तेथे मला कोणीही ओळखण्याची शक्यता कमी होती. त्यामुळेच मी तेथे जाण्याचा निर्णय घेतला होता, असं दिलीप कुमार सांगतात. तोपर्यंत उर्दू, फारसी आणि इंग्रजी या भाषा दिलीप कुमार यांना चांगल्याच येऊ लागल्या होत्या. पुण्यात गेल्यानंतर रागात असलेल्या दिलीप यांनी भूक लागली म्हणून ते एका इराणी हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी चहा आणि बिस्किटांची ऑर्डर दिली. यावेळी त्यांनी हॉटेलच्या मालकाशी फारसी भाषेत संवाद साधल्याने ते भलतेच खूश झाले.

dilip kumar
दिलीप कुमार यांचे टॉप-10 चित्रपट

याविषयी दिलीप कुमार लिहितात की, 'हॉटेलमध्ये असिस्टंट किंवा इतर कोणते काम करण्यासाठी जागा रिकामी आहे का, असे मी मालकाला विचारले. त्यावर त्यांनी मला अँग्लो-इंडियन मालकाशी भेटण्यास सांगितले. मी त्यांचीही भेट घेतली. मला इंग्रजी भाषा चांगली बोलता येत असल्यामुळे त्यांनी कॅन्टीन ठेकेदार म्हणून माझी नियुक्ती करण्याचे ठरवले. त्यावेळी दिलीप कुमार कॅन्टीन आणि सेना क्लब अशा दोन्ही ठिकाणांचे काम पाहत होते. त्यावेळी त्यांना 36 रुपये पगार मिळायचा. दरम्यान, काही काळानंतर दिलीप कुमार यांनी हे काम सोडले आणि बॉम्बे टॉकिजमध्ये काम सुरु केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()