Brijesh Tripathi Passed Away: अभिनेते ब्रिजेश त्रिपाठींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! रविकिशनने व्यक्त केला शोक

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन झाले आहे.
Brijesh Tripathi Passed Away:
Brijesh Tripathi Passed Away:Esakal
Updated on

Brijesh Tripathi Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दुख:द बातमी समोर आली आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. मिडिया रिपोर्टनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिडिया रिपोर्टनुसार, ब्रिजेश यांना 2 आठवड्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर मेरठमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, नुकतच मुंबईत परतल्यानंतर रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे कुटुंब मुंबईत राहतात. सोमवारी ब्रिजेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या बातमीनंतर भोजपुरीच नव्हे तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी 46 वर्षांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात काम केले होते. 1979 मध्ये 'सैया तोहरे कारण' या चित्रपटातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. 1980 मध्ये आलेला 'टॅक्सी चोर' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

भोजपुरी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्यांनी बॉलिवू़डमध्येही काम केले होते. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. ब्रिजेश त्रिपाठी 'नो एन्ट्री', 'ओम', 'गुप्ता: द हिडन ट्रुथ', 'मोहरा', 'देवरा भईल दीवाना', 'हमार बॉडीगार्ड शिवा', 'ड्रायव्हर राजा', 'पिया चांदनी', 'राम कृष्ण बजरंगी' आणि 'जनता दरबार'या चित्रपटात काम केले होते.

ब्रिजेश त्रिपाठी यांनी बॉलीवूडमध्ये अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, रवी किशन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासह इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांनी बॉलिवूडमध्ये 250 हून अधिक चित्रपटात केले आहेत.

तर भोजपूरीत मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव, पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी कलाकरांसोबत काम केले होते.

चित्रपट अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी ब्रिजेश त्रिपाठींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'आम्ही ब्रिजेश त्रिपाठीजींसोबत जवळपास 100 चित्रपट केले होते, त्यांचे जाणे म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एका युगाला निरोप देणे होय. ईश्वर त्यांच्या आत्म्याला स्वर्गात सर्वोच्च सन्मान देवो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.