Bhalchandra Kulkarni: कोल्हापूरची शान ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

भालचंद्र यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय
Bhalchandra Kulkarni, Bhalchandra Kulkarni passed away
Bhalchandra Kulkarni, Bhalchandra Kulkarni passed awaySAKAL
Updated on

Bhalchandra Kulkarni Passed Away: मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. भालचंद्र यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र यांनी नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत.

(veteran marathi actor bhalchandra kulkarni passed away at the age of 88)

Bhalchandra Kulkarni, Bhalchandra Kulkarni passed away
Suruchi Adarkar: खूपच गोड लालपरी सोनपरी

भालचंद्र कुलकर्णी अनेकदा त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी ओळखले जातात. भालचंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. काहीच महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या समोर आले होते.

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक सुद्धा होते. याशिवाय चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव केला. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Bhalchandra Kulkarni, Bhalchandra Kulkarni passed away
Twinkle Khanna: "प्रेमात असल्यास फक्त बेडच नाही तर टॉयलेटसुद्धा.." बाबा ट्वींकल देवचं ज्ञान

कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या कारकिर्दीत मिळालेला त्यांचा शेवटचा पुरस्कार ठरला. भालचंद्र यांनी जुन्या मराठी सिनेमांचा समृद्ध काळ जवळून बघितला आहे. याशिवाय डॉ. श्रीराम लागू, ,लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अभिनय केलाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()