Rajabhau More Passes Away: ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन, नाटक पाहतानाच..

रंगभूमीवर अनेक दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या राजाभाऊ मोर यांना नाटक पाहत असतानाच हृदयविकाराचा झटका आला.
veteran marathi actor rajabhau more died while watching play in amravati
veteran marathi actor rajabhau more died while watching play in amravatisakal
Updated on

rajabhau more: नाट्य रसिकांच्या काळजात चर्रर करणारी एक बातमी अमरावतीमधून समोर आली आहे. रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अमरावती शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (वय७८वर्ष )यांचा काल रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आयुष्यभर ज्या रंगभुमीची सेवा केली, त्याच रंगभुमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. नाटक पाहत असताना त्यांना मृत्यू आला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोकाकळा पसरली आहे.

(veteran marathi actor rajabhau more died while watching play in amravati)

veteran marathi actor rajabhau more died while watching play in amravati
Vishakha Subhedar: मालिका सुरू होण्याआधीच विशाखा सुभेदार ट्रोल! तिनंही दिलं सडेतोड उत्तर..

अमरावती येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील 'थँक यु मिस्टर ग्लाड' हे नाटक सुरू होते. यावेळी राजाभाऊ मोरे प्रेक्षकगृहात बसून नाटक पाहत होते आणि त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात येत होते, मात्र त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. एका ज्येष्ठ रंगकर्मीने नाट्यगृहातच अखेरचा श्वास घेतल्याने संपूर्ण अमरावतीकर हळहळले आहे, आज शुक्रवारी, सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

veteran marathi actor rajabhau more died while watching play in amravati
Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..

राजाभाऊ मोरे यांना नाट्य परिषदेच्या वतीने यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य नाटकासाठी वेचले. अमरावती आणि . आसपासच्या ग्रामीण भागत नाटक पोहोचवण्यामध्ये, नाट्य चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहए. तेव्हाचे नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ वर्षांपूर्वी राजाभाऊंनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती.

राजाभाऊ यांच्या निधनानंतर सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचे दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()