Sri Ramana: दिग्गज पटकथा लेखक श्री रमण यांचे निधन, वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप

तेलुगू चित्रपट आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी श्री रमण यांना ओळखले गेले
Veteran Telugu screenwriter Sri Ramana passes away at the age of 70
Veteran Telugu screenwriter Sri Ramana passes away at the age of 70 SAKAL
Updated on

Sri Ramana Passed Away News: प्रख्यात पटकथा लेखक श्री रमण यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या लेखणीने भारतीय चित्रपटसृष्टीत छाप सोडली.

श्री रमण यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तेलुगू चित्रपट आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी श्री रमण यांना ओळखले गेले.

(Veteran Telugu screenwriter Sri Ramana passes away at the age of 70)

Veteran Telugu screenwriter Sri Ramana passes away at the age of 70
Ishita Dutta: दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता झाली आई, सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव

श्री रमण यांच्या लोकप्रिय कलाकृती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 19 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या उल्लेखनीय कामांमध्ये 'मिथुनम' (2012) या सिनेमाची पटकथा समाविष्ट आहे. या सिनेमाच्या पटकथेसाठी त्यांना ओळखले जाते.

गायक-अभिनेते एसपी बालसुब्रमण्यम आणि लक्ष्मी अभिनीत रोमँटिक ड्रामा चित्रपट याच नावाच्या रामन यांच्या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला मानाचा नंदी पुरस्कारही मिळाला होता.

श्री रमण यांच्या उल्लेखनीय कलाकृती

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जन्मलेले श्री रमण एका साप्ताहिक मासिकातील त्यांच्या आकर्षक आणि प्रभावी लेखांमुळे प्रसिद्ध झाले होते. आपल्या प्रभावी लेखणीने त्यांनी वाचकांना समृद्ध केले. अक्षरा थुनिराम या टोपणनावाने त्यांना ओळखले जाते.

लेखनासोबतच स्वतःचं टोपणनाव वापरत त्यांनी इतर अनेक मासिकांमध्ये व्यंगचित्रे लिहिली. 'जोक्की ज्योती', 'श्री वाहिनी', 'पंढरी' आणि 'मोगली रेकुलू' यांसारख्या अनेक उल्लेखनीय कलाकृती श्री रामणा यांनी लिहील्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.