Prashanth Narayanan: लोकप्रिय दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचं ५१ व्या वर्षी निधन

लोकप्रिय दिग्दर्शक प्रशांत नारायण यांचं ५१ व्या वर्षी निधन
veteran theatre director Prashanth Narayanan passed away at the age of 51
veteran theatre director Prashanth Narayanan passed away at the age of 51SAKAL
Updated on

Prashanth Narayanan Passed Away: प्रसिद्ध नाटककार प्रशांत नारायणन यांचे गुरुवारी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. प्रशांत नारायणन 51 वर्षांचे होते. त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते.

veteran theatre director Prashanth Narayanan passed away at the age of 51
Sonal Pawar Wedding: 'तुला पाहते रे', 'रमा राघव' फेम अभिनेत्री सोनलचा विवाहसोहळा, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

तीन दशकांहून अधिक काळ नाट्यविश्वात आपली छाप सोडणाऱ्या नारायणन यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात नाटकेही लिहिली, त्यातील काही नाटकांनी भाषेच्या सीमा तोडून नाट्यप्रेमींची मने जिंकली.

veteran theatre director Prashanth Narayanan passed away at the age of 51
Siddharth Chandekar: नवीन वर्षात सिद्धार्थ चांदेकरवर होणार 'श्रीदेवी प्रसन्न'! 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल आणि मुकेश यांनी प्रशांत लिखित 'छायामुखी' या नाटकात काम केले होते, ज्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रशांतची ख्याती राज्यातील प्रेक्षकांमध्ये आणखी वाढली.

नारायणन यांनी 'मणिकर्णिका', 'ताजमहाल' आणि 'कारा' यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते.

veteran theatre director Prashanth Narayanan passed away at the age of 51
Twinkle Khanna Birthday: वयाच्या ४९ व्या वर्षी ट्वींकल खन्ना करतेय अभ्यास, लंडनमध्ये करतेय मास्टर्सची तयारी

नारायणन यांना 2003 मधील सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. केरळचे सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, "राज्याने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे ज्याने गेल्या तीन दशकांमध्ये रंगभूमीच्या जगावर आपली छाप सोडली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.