अभिनेता विकी कौशलने Vicky Kaushal Birthday Special नेहमीच त्याच्या अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'मसान', 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक', 'राजी' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या विकीचा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. विकीचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईत झाला. आज त्याचा ३३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त संपूर्ण जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज विकी कौशल Vicky Kaushal बॉलिवूडमधला दमदार अभिनेता असला तरी त्याने अभिनयक्षेत्रात काम करावं ही त्याच्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. (vicky kaushal father never wanted him to be an actor some unknown facts about uri actor)
विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंटमन आहेत. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. श्याम कौशल यांना अनेकदा काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपल्या मुलाच्या वाट्याला हा संघर्ष कधीच येऊ नये, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांचा अभिनयक्षेत्राला विरोध होता.
इंजिनीअरिंगचं घेतलं शिक्षण
विकीने मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्याला बालपणापासूनच अभिनयात रस होता. विकीला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं होतं. यासाठी त्याने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करताच किशोर नमित कपूर अॅक्टिंग अॅकेडमित प्रवेश घेतला.
सुरुवातीला त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं. त्यानंतर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मसान' या चित्रपटात त्याला अभिनयाची पहिली संधी मिळाली. अत्यंत कमी बजेट असलेल्या या चित्रपटात विकीने त्याच्या दमदार अभिनयाची छाप सोडली.
२०१६ मध्ये त्याने 'रमन राघव २.०' या चित्रपटात काम केलं. यामध्ये त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दिकीसारखा तगडा कलाकार होता. तरीसुद्धा विकीने स्वत:चं अभिनयकौशल्य सिद्ध केलं. त्याने आतापर्यंत 'राजी', 'संजू', 'मनमर्जियाँ', 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'भूत : द हाँटेड शिप' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.