विकी-कतरिनाच्या लग्नाबाबत चुलत बहिणीचा मोठा खुलासा

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
vicky, katrina
vicky, katrinainstagram
Updated on

अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध जोडी आधी मुंबईत कोर्ट मॅरेज आणि त्यानंतर राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता या सर्व चर्चांबाबत विकीच्या चुलत बहिणीने मोठा खुलासा केला आहे. विकीची चुलत बहीण उपासना वोहराने लग्नाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपासना यांनी विकी-कतरिनाच्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं आहे.

'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "माध्यमांमध्ये लग्नाची तारीख, स्थळ यांबाबतची वृत्तं दिली जात आहेत. मात्र हे लग्न होणारच नाही. ते दोघं खरंच लग्न करणार असते, तर त्यांनी सांगितलं असतं. बॉलिवूडमध्ये अशा अफवा लगेच पसरतात आणि नंतर त्या नाहीशासुद्धा होतात. या फक्त काही काळापुरता चर्चा असतात. मी विकीशी नुकतंच बोलले. तो इतक्यात तरी लग्न करणार नाही."

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पुढील महिन्यात रणथंबोरच्या बाहेर सिक्स सेन्स फोर्ट बरवरामध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय.

vicky, katrina
२०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीसोबत जॅकलिनचा रोमँटिक फोटो; दोघांचं कनेक्शन उघड

कतरिना आणि विकी लग्नाविषयी स्वतः काही सांगत नसले तरी त्यांची टीम लग्नाच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचबरोबर अनेक इव्हेंट कंपन्या या व्हीआयपी लग्नाची व्यवस्था करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र इव्हेंट कंपनीला जबाबदारी देण्यात आल्याचं समजतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()