Vicky Kaushal's Father Sham kaushal: बॉलीवूडचे प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल हे जरी आता अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणून ओळखले जात असले तरी बॉलीवूडच्या बड्या सिनेमांचा एक काळ त्यांनी आपल्या अॅक्शननी गाजवला आहे. दंगल, बाजीराव मस्तानी,पद्मावत, क्रिश ३ आणि अशा कितीतरी बड्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटशी संवादा दरम्यान त्यांनी एक शॉकिंग खुलासा केला आहे,ज्यामुळे अर्थातच ऐकणाराही भावूक होऊन जाईल. या मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरवर बोलताना आपल्या कॅन्सरशी झालेल्या लढ्याचा देखील खुलासा केला आहे. आपल्या या आजाराविषयी खूप कमी जणांना माहित असल्याचं देखील ते म्हणाले. एका क्षणी आजारानं आयुष्य संपवून टाकावं असं वाटत होतं पण देवाचे आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ यामुळं या कठीण प्रसंगातूनही मार्ग निघत गेला असं ते म्हणाले.(Vicky Kaushal's father Sham Kaushal had stomach cancer; action director opens up for the first time)
याविषयी अधिक सांगताना श्याम कौशल पुढे म्हणाले, ''२००३ मध्ये जेव्हा मी लडाखहून लक्ष्य सिनेमाचं शूटिंग संपवून परत आलो तेव्हा माझ्या पोटात मला असह्य कळा जाणवू लागल्या. त्याचवेळी श्याम बेनेगलांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सिनेमाचं शूट सुरू होतं. आम्हाला दिवाळीची सुट्टी मिळाली होती. त्या दरम्यान या वेदना अधिक वाढू लागल्या. मी लगेच नानावटी रुग्णालयात चेकअप साठी गेलो. मला तिथं अॅडमिट करण्यात आलं आणि पोटाचं ऑपरेशनही करण्यात आलं. त्या ऑपरेशनमुळे खूप कॉम्पिलेक्शन्स निर्माण झाले होते. मी नानावटी मध्ये एकदा नाना पाटेकरसोबत गेलो होतो,अर्थात तेव्हा मला अॅपेन्डिक्सचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे डॉक्टर मला ओळखत होते आणि माझ्या शारीरिक तक्रारी त्यांना माहित होत्या''.
''डॉक्टरांनी नाना पाटेकरला फोन केला,तेव्हा तो पुण्यात शूट करत होता. पण त्याला फोन जाताच तो तडक निघाला आणि नानावटीत पोहोचला. माझी त्यावेळी शुद्ध हरपली होती,माझ्या पोटात इन्फेक्श झालं होतं. डॉक्टरांनी पोटाचा काही भाग कापून तपासणीसाठी पाठवला, आणि रीपोर्टमध्ये कळालं,मला कॅन्सर झाला आहे. मला माहित नव्हतं मी वाचेन की मरेन. मी कोणालाच त्यावेळी काही सांगितलं नाही. मी ५० दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये होतो. वर्षभर मला चेकअपसाठी सारखं बोलावलं जायचं. माझं भाग्य होतं की कॅन्सर पुढं अंगात पसरला नव्हता. आज तब्बल १९ वर्ष झाली या गोष्टीला''.
''त्यावेळी मला वाटत होतं,मी असा झोपून राहिलो तर कुटुंबाचं कसं होणार,विकी आणि सनी लहान होते. मला सगळा अंधार दिसत होता. प्रोजेक्ट हातात होते पण ऑपरेशन झाल्यामुळे काम करायची परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती. त्यावेळी ५० दिवसांनी मी बरा होऊन परतलो आणि अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे केला. कारण तो माझ्यासाठी थांबला होता. तो मला म्हणालेला, श्याम सर हा सिनेमा फक्त तु्म्हीच करु शकता. मला दुसरा कोणताही अॅक्शन डायरेक्टर नको. हा क्षण शेअर करताना श्याम कौशल भावूक झाले होते''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.