मुंबई - आपल्या आवडत्या अभिनेत्रींनं अमुक एखाद्या अभिनेत्याशीच लग्न करावं अशी त्या फॅन्सची इच्छा असते. असे अनेकदा दिसूनही आले आहे. मात्र अनेकदा तसे होत नाही. त्यावेळी त्या चाहत्यांची निराशा होती. बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि जुही चावला (juhi chawala) या दोन्ही अभिनेत्रींबाबत हे सांगता येईल. त्यांनी बॉलीवूडमधल्या त्या वेळच्या सर्व स्टार अभिनेंत्यासोबत काम केले. मात्र जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्यांची चॉईस बॉलीवूड नव्हती. त्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. ( video of bollywood actress madhuri dixit and juhi chawla spoke why neither of them married a bollywood hero )
बॉलीवू़डची धकधक क्वीन आणि जुहीनं अखेर बॉलीवूड (bollywood) सोडून इतर व्यक्तींबरोबर का लग्न (wedding) केलं. त्यावर त्यांनी करण जोहरच्या कॉफी विथ (coffee with karan) करण कार्यक्रमात खुलासा केला आहे, त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता हा व्हि़डिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. वास्तविक 2014 मध्ये या दोघीजणी करणच्या कार्यक्रमात आल्या होत्या तेव्हाची ती मुलाखत आहे.
जुही चावलानं 1995 मध्ये उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केलं होतं. तर माधुरीनं 1999 मध्ये अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. करण जोहरनं आपल्या शो मध्ये या दोन्ही अभिनेत्रींना बोलते केले होते. त्यात त्यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यत बॉलीवूडच्या वेगवेगळ्या स्टार सोबत काम केले. मात्र त्यांच्याशी लग्न करावे असे कधीही वाटले नाही.
करणच्या त्या प्रश्नावर माधुरी म्हणाली, मी शाहरुख (shahrukh khan) आणि सलमान (salman khan) सोबत बराच काळ काम केलं आहे. तर आमीर सोबत दोन चित्रपट केले आहेत. मात्र मला त्यांच्यात कोणीही आवडत नव्हतं की, मी त्यांच्यासोबत लग्न करु. माझे पती हे खरे हिरो आहेत. दुसरीकडे जुहीनं सांगितलं की, जय माझ्यासाठी नेहमी कार्ड, फुलं पाठवायचा. त्यामुळे मला जास्त आवडत असे. मला बॉलीवूडमधील कुणाशी लग्न करावं असं वाटलं नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.