Vidya Balan : 'विद्या बालन'च्या नावानं सोशल मीडियावर घातला गंडा, अभिनेत्रीनं दाखल केली FIR! नेमकं काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan Lodge FIR) नावानं फसवणूकीचा प्रकार आता समोर आला आहे.
Vidya Balan Latest news
Vidya Balan Latest newsesakal
Updated on

Vidya Balan Lodge FIR : सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे नाव घेऊन गंडा घालण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींचे डीफ फेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्याची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानापासून झाली होती. त्यात आलिया भट्ट पर्यत अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आता प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या नावानं सोशल मीडियावर (vidya balan fake insta id) फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर अभिनेत्रीनं संबंधित संशयित आरोपीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. विद्या बालनचे नाव घेत फसवणूक झाल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयात.

सोशल मीडियाचा वापर करत अनेक सेलिब्रेटी हे लाईमलाईटमध्ये राहत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या आधारे आपली लोकप्रियता आणि चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा सध्याचा फंडा हा अनेकांना नवीन नाही. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणूकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र कित्येकदा त्या सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून आले आहे.

एनआयनं याबाबत एक्सवर पोस्ट शेयर करत या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्या बालननं मुंबईतील खार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार (lodge fir) दाखल केली आहे. त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एकानं विद्या बालनचे नाव घेऊन तिच्या नावानं फेक इंस्टा आयडी (vidya balan fake sta id News) तयार केले आहे. त्यानंतर तो लोकांकडे पैशांची मागणी करु लागला. तो केवळ पैशांची मागणी करत नव्हता तर त्यांना नोकरीचे आमिषही दाखवू लागला होता.

विद्या बालनच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित अज्ञाताच्या विरोधात आयपीसी च्या ६६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

विद्याच्या बाबत सांगायचे झाल्यास ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या ही तब्बल ९ मिलियनपेक्षा जास्त आहे. विद्याच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी सांगायचे झाल्यास, ती पुन्हा मंजुलिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.