Vidya Balan Video: फिल्ममेकर गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांची प्री वेडिंग कॉकटेल पार्टी नुकतीच मुंबईत पार पडली. या पार्टीत अनेक बॉलीवूडकरांनी हजेरी लावली होती. कोंकणा सेन शर्मा,विशाल खेशल,करण जोहर,भावना पांडे,संजय कपूर,माहीप कपूर आणि इतर अनेकजण उपस्थित राहिलेे होते . या पार्टीत विद्या बालन देखील आपला पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. त्यावेळी पापाराझीला फोटोसाठी पोझ द्यायला ती जात होती तेव्हाच तिच्यासोबत लाजिरवाणी गोष्ट होता होता राहिली,म्हणजे तिनं हुशारीनं सगळं सावरलं म्हणू या.
व्हायरल व्हिडीओत तर दिसत आहे की तिची साडी सुटता सुटता राहिली. अर्थात हे सगळं घडलं पार्टीत उपस्थित दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्यामुळे. आता व्हिडीओ पाहून अनेकजण सतिश कौशिकांना दोष देताना दिसत आहेत. चला,जाणून घेऊया नेमकं काय घडलं विद्यासोबत.(Vidya Balan oops moment in guneet monga sunny kapoor pre wedding party)
त्याचं झालं असं की, विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत गुनीत मोंगाच्या कॉकटेल पार्टीला पोहोचली होती. यावेळी तिनं नेहमी प्रमाणेच सुंदर साडी नेसली होती. कार्यक्रम स्थळी जिथनं एन्ट्री करायची होती तिथं काहीजण उभे होते अन् मीडियाची गर्दी देखील होती. त्याचवेळी सतिश कौशिक पार्टीतून बाहेर येत होते आणि विद्या आपल्या पती सोबत पार्टीत एन्ट्री घेत होती. तेव्हाच सतीश कौशिकांच्या हातात विद्याचा पदर आला आणि तो खेचला गेला. आणि त्यामुळे तिच्या सुळसुळीत साडीच्या प्लेट्सही खोलल्या गेल्या.
हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
पण विद्या साडी नेसण्यात आता सराईत असल्यामुळे तिनं चपळाईनं सुटणाऱ्या साडीला सावरलं आणि झटपट पुन्हा नेसलं. पण हा व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सतिश कौशिक यांचा क्लास घ्यायला सुरुवात केली आहे. लोकांचे म्हणणे आहे की,सतीश कौशिकांनी पदर खेचला ते खेचला,चुकून का होईना... पण पलटून माफी देखील मागितली नाही सरळ निघून गेले. जी खूपच चुकीची गोष्ट आहे.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-'सतीश कौशिकनी माफी मागितली नाही,सरळ निघून गेले. काय माणूस आहे'. तर आणखी एकाने लिहिले आहे-'जाणूनबुजून पदर पकडलेला स्पष्ट दिसतंय'. अशा खूप संतापजनक प्रतिक्रिया विद्या बालनच्या व्हायरल व्हिडीओवर उमटताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.