Bollywood Actress: बॉलीवूडमधील दोन दिग्गज अभिनेत्री आता एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहे. विद्या बालन (Vidya Balan) आणि शेफाली शहा (Shefali Shah) यांच्या जलसानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यापूर्वी शेफाली शहा यांच्या दिल्ली क्राईमनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या ह्युमन (Human Web serise) नावाच्या मालिकेनं जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. विद्या बालनचा शेरनीनंतर एक नवा अवतार आता जलसामधून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर जलसाचा ट्रेलर (Jalsa Trailer Viral) व्हायरल झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला आहे.
विद्या बालन आणि शेफाली शाह या आपल्या काळातील दोन उत्कृष्ट अभिनेत्रींच्या अतूलनीय अभिनयाच्या जुगलबंदीने नटलेला हा चित्रपट मानवी भावनांच्या चित्तवेधक कथेचे प्रतिबिंब दाखवतो. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित, जलसा ची निर्मिती भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, शिखा शर्मा आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. या चित्रपटात मानव कौल, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन यादव अशी तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला नव्या दमाचे सूर्या काशीभटला आणि शफीन पटेल यांसारख्या अभिनेते देखील आहेत. अॅमेझॉन ओरिजिनल मुव्ही जलसा १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
जलसाचा आकर्षक ट्रेलर आपल्याला माया (विद्या बालन) आणि रुक्साना (शेफाली शाह) या दोन मुख्य पात्रांची ओळख करून देतो, हे कथानक त्यांच्या सभोवतालची अराजकता, रहस्ये आणि खोटेपणा , सत्य आणि फसवणूकव यामुळे त्यांच्या सभोवतालच्या जगाला गोंधळात टाकणारी जीवन बदलणारी घटना तसेच विमोचन आणि प्रतिशोधाचे द्वंद्व युद्ध याभोवती फिरते. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी सांगितले की -“जलसा हा एक थरारपट आहे. या चित्रपटात विद्या व शेफाली आणि बाकीच्या कलाकारांच्या समर्थ, भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या अभिनयाने सजलेली रहस्ये, सत्य, विडंबन यांच्या मदतीने गुंफलेल आकर्षक कथा देण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात माया मेनन या पत्रकाराची भूमिका करणारी विद्या बालन म्हणाली- "मी करत असलेल्या प्रत्येक चित्रपटात, एक नवीन कथा सांगण्याचा आणि मी आत्तापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा वेगळी व्यक्ती बनण्याचा माझा प्रयत्न असतो आणि जलसाने ह्या सर्वच गोष्टींची पूर्तता केली आहे. जलसा ने मला गूढ आणि गहि-या विषयात डोकावण्याची संधी दिली आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हा खूप आव्हानात्मक, समृद्ध करणारा आणि परिपूर्ण करणारा अनुभव होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.