चित्रपटाच्या प्रमोशनमुळे झोपायला वेळच मिळेना! मग अभिनेता विमानातच...

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्याला झोपेसाठी वेळच मिळत नाही.
Vidyut Jammwal News
Vidyut Jammwal News esakal
Updated on

नवी दिल्ली : अभिनेता विद्युत जामवालचा चित्रपट 'खुदा हाफिज २' शुक्रवारी ८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्युत खूपच व्यस्त होता. या दरम्यान अभिनेत्याला आराम करण्यासही वेळ मिळाला नाही. अशा स्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मधल्या वेळेत विद्युत विमानात झोपल्याचे दिसले. दरम्यानचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओत झोपण्यासाठी अभिनेता विमानातच अंगावर चादर घेऊन झोपल्याचे दिसत आहे. (Vidyut Jammwal Sleep In The Flight Video Goes Viral)

Vidyut Jammwal News
जितके निर्लज्ज बनाल, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका

इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या व्हिडिओत अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) विमानात अंगावर चादर घेऊन झोपलेला दिसत आहे.आसन स्थान (सीट) रिकामे असून अभिनेता खाली झोपला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आराम करण्याची वेळ नाही, विद्युत जामवाल प्रमोशन्स दरम्यान ट्रांझिटमध्ये एक पाॅवर नॅप घेताना! या व्हिडिओवर सोशल मीडियावर युजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, चमत्कारी कल्पना आहे, मी पण ट्राय करणार आहे.

Vidyut Jammwal News
काली पूर्वीही 'या' चित्रपटांमध्ये हिंदू देवी-देवतांवरुन वाद, बंदीची होती मागणी

दुसरा चाहता म्हणतो, मेहनतीची झोप, निवांत झोप. विद्युत जामवालचा चित्रपट खुदा हाफिज (Khuda Hafiz 2) प्रदर्शित होण्यापूर्वीच विवादात अडकली आहे. चित्रपटाच्या हक हुसेन गाण्यावर शिया समुदायाच्या लोकांना रोष व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की गाण्यात हुसेन शब्दाचा वापर केला गेला आहे आणि त्यात वादग्रस्त सीन आहे. मात्र आता चित्रपट (Film) निर्मात्यांनी यावर माफी मागितली आहे आणि सोशल मीडियावर आपले म्हणणे शेअर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.