Brahmastra 2: ना रणवीर,ना हृतिक 'ब्रह्मास्त्र २' साठी करण जोहरच्या मनात भलताच अभिनेता, समोर आलं नाव

'ब्रह्मास्त्र २' च्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. निर्माता असलेल्या करणच्या चॉइसला दिग्दर्शक अयान मुखर्जी किती प्राधान्य देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले.
Vijay Deverakonda as dev in ranbir-alia brahmastra 2,karan johar choice,here is the truth..
Vijay Deverakonda as dev in ranbir-alia brahmastra 2,karan johar choice,here is the truth..Google
Updated on

Brahmastra 2: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा सिनेमा 'ब्रह्मास्त्र' ९ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटर्समध्ये रिलीज केला जाणार आहे. रिलीज होण्याआधीच सिनेमाला बॉयकॉट टीमनं घेरलं होतं अन् त्यामुळे सिनेमा वादात सापडला होता. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर मात्र त्यानं बॉक्सऑफिसवर भरघोस कमाई केली. अर्थात त्यावरनं देखील अनेक प्रश्न उठले. या सगळ्या दरम्यान आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज झाला आहे. शॉकिंग गोष्ट ही आहे की ओटीटीवर सिनेमा स्ट्रीम झाल्यानंतर लोक सोशल मीडियावर सिनेमाची प्रशंसा करताना दिसत आहेत. (Vijay Deverakonda as dev in ranbir-alia brahmastra 2,karan johar choice,here is the truth..)

Vijay Deverakonda as dev in ranbir-alia brahmastra 2,karan johar choice,here is the truth..
Alia- Ranbir च्या मुलीसंदर्भात पाकिस्तानातून केली गेली पोस्ट; शुभेच्छा न देता थेट...

सिनेमा बॉयकॉट का केला असं म्हणताना लोक दिसत आहेत. या सिनेमाच्या पुढील भागाची म्हणजे 'ब्रह्मास्त्र २' ची देखील जोरदार चर्चा आतापासून रंगली आहे. सिनेमातील देवच्या भूमिकेविषयी भरपूर औत्सुक्य पहायला मिळत आहे. याआधी देवच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग,हृतिक रोशनच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली पहायला मिळाली होती. त्यानंतर बातमी आली की केजीएफ स्टार यश सिनेमात 'देव' साकारणार आहे. पण आता विजय देवरकोंडाचे नाव समोर येत आहे. चला जाणून घेऊया,या गोष्टीत किती तथ्य आहे त्याविषयी.

Vijay Deverakonda as dev in ranbir-alia brahmastra 2,karan johar choice,here is the truth..
Covid 19 वर सिनेमा बनवत आहेत विवेक अग्निहोत्री, 'या' महत्त्वाच्या घटनेभोवती फिरणार कथा

विजय देवरकोंडाने पुरी जगन्नाथच्या 'लाइगर' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला करण जोहरने प्रोड्युस केले होते. संपूर्ण टीमनं सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. पण तरीदेखील सिनेमा बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. अशामध्ये आता करणला वाटतंय की विजयला पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये एक संधी मिळायला हवी आणि म्हणून त्याला अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र २' मध्ये विजयला कास्ट करायचं आहे.

अर्थात याविषयी अधिकृत असं काहीच बोललं गेलेलं नाही. मेकर्सनी विजयला यासंदर्भात संपर्क साधलेला नाही. अद्याप अयान मुखर्जी स्क्रीप्टवर काम करत आहे,आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कोणालाच कास्ट करायचा विचारही करणार नाही,हे तो मागेच म्हणाला होता.

विजयच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर 'लाइगर' फ्लॉप झाल्यानंतर तो गायब झाला होता. कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमांमधून तो दिसत नव्हता. त्याचा 'जन गण मन' सिनेमा देखील फारसा चालला नव्हता. पण नुकताच तो एका कार्यक्रमात दिसला,तेव्हा त्याला त्याच्या कमबॅकविषयी विचारलं गेलं. तेव्हा तो म्हणाला,''मी कुठेच गेलोलो नाही,इथेच आहे''. विजयला आता समंथा रुथ प्रभु सोबत 'खुशी' सिनेमात आपण पाहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.